शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अपघातविरहित वाहतुकीत गडचिरोली विभाग राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2017 01:08 IST

नक्षलग्रस्त आणि भौगोलिक क्षेत्रातील ७६ टक्के भाग जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात एसटी महामंडळाने

नफ्यातही आघाडीवर : एसटीचा ६९ वा वर्धापन दिन उत्साहात लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि भौगोलिक क्षेत्रातील ७६ टक्के भाग जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात एसटी महामंडळाने अपघातविरहित सेवेत राज्यात आघाडी घेतली आहे. अपुरे मनुष्यबळ असतानाही नफ्यात येणाऱ्या राज्यातील केवळ दोन विभागात गडचिरोली विभागाचा समावेश आहे हे विशेष. एसटी महामंडळाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवारी (१ जून) गडचिरोलीचे विभागीय नियंत्रक विनय गव्हाळे यांनी यासंदर्भात माहिती दिली. ६९ वर्षापूर्वी एसटी महामंडळाची पहिली बस अहमदनगर ते पुणे अशी धावली होती. आज महामंडळाच्या १७ हजार बसेस आहेत. त्यात गडचिरोली विभागात २६० बसेस चालतात. विभागांतर्गत गडचिरोली, ब्रह्मपुरी आणि अहेरी या तीन आगारांमध्ये आज ५० वाहक आणि ४० चालकांची कमतरता आहे. मात्र तरीही हा विभाग नफ्यात आहे. केवळ लातूर आणि गडचिरोली हे दोनच विभाग नफ्यात असल्याची माहिती गव्हाळे यांनी दिली. या विभागात अपघाताचे प्रमाण वर्षात ०.०८ टक्के आहे. उन्हाळी सुट्यांमध्ये १०५ मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बसेस प्रवासी सेवेत घेतल्या जातात. त्यामुळे दररोज २५ ते ३० लाखांचे उत्पन्न महामंडळाला होत आहे. मनुष्यबळ भरल्यनंतर तेलंगणा, आंध्रप्रदेशच्या फेऱ्या वाढणार आहेत. प्रवाशांना दिले गुलाबपुष्प एसटी महामंडळाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवारी सकाळी गडचिरोली ते नांदेड या बसला फुलांनी सजवून पाठविले. तसेच एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना गुलाबपुष्प दिले आणि सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या बसेसनेच प्रवास करण्याचे आवाहन केले. यावेळी आगार व्यवस्थापक विनेश बावणे, वाहतूक निरीक्षक के.जे. लिंगलवार, सहा.निरीक्षक सोनी लिचडे, सुधाकर कामडी, लिपिक श्रीकांत दुपारे, विवेक फाये, नवीन बनवाल आदी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. गडचिरोली विभागात टीम वर्क चांगले आहे. शिवाय खेळीमेळीचे वातावरण आहे. बसगाड्यांच्या स्वच्छतेसोबत प्रशाशांसोबत सौजन्याची वागणूक ठेवली जाते. त्यामुळे मनुष्यबळाच्या कमतरतेसारख्या अनेक अडचणी असतानाही सर्वजण अडचणींवर मात करून चांगले काम करीत आहेत. - विनय गव्हाळे, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ, गडचिरोली