शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात वीज समस्येविरोधात गावकरी उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 13:23 IST

कोरचीपासून ३७ कि.मी.अंतरावर अतिसंवेदनशील नक्षल भागातील कोटगुल येथे सतत सुरू असलेल्या वीज पुरवठ्याच्या समस्येने त्रस्त नागरिकांनी शनिवारी सकाळपासून चक्काजाम आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देकोटगुल येथे चक्काजाम मंजूर वीज उपकेंद्र सहा वर्षानंतर झालेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली :  कोरचीपासून ३७ कि.मी.अंतरावर अतिसंवेदनशील नक्षल भागातील कोटगुल येथे सतत सुरू असलेल्या वीज पुरवठ्याच्या समस्येने त्रस्त नागरिकांनी शनिवारी सकाळपासून चक्काजाम आंदोलन सुरू केले. भल्या पहाटे सुरू झालेल्या या आंदोलनात गावातील महिला-पुरूषांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यही सहभागी झाले आहेत.कोटगुल येथे २०१२ मध्ये ३३ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर झाले. मात्र आता सहा वर्षानंतरही ते सुरू न झाल्याने कोटगुलला वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे कोटगुलमधील नागरिकांनी शनिवारी सकाळपासून कोटगुल-मुरूमगाव, कोटगुल-कोरची मार्गावर चक्काजाम आंदोलन सुरु केले. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा लोहम्बरे, कोरची पंचायत समितीचे उपसभापती श्रावण मातलाम, कोटगुलचे सरपंच राजेश नैताम, सोनपूरचे सरपंच नरपतसिंग नैताम, माजी पंचायत समिती सदस्य रामदास हारामी आणि परिसरातील बहुसंख्य युवक, महिला सहभागी झाले.अतिसंवेदन नक्षलग्रस्त कोटगुल परिसरात दोन पोलीस मदत केंद्र तर एक प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन शासकीय आश्रमशाळा, ३१ जिल्हा परिषद शाळा आहेत, ७ ग्राम पंचायत असून ४० गावे आहेत. या परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. या परिसरात महिन्यातून केवळ एक-दोन दिवस पुरवठा अखंडितपणे सुरू असतो, बाकीचे सर्व दिवस कधीही वीज पुरवठा खंडित होतो. याला कंटाळून या भागातील लोकांनी शनिवारी सकाळी सकाळपासूनच आंदोलनाचा पवित्रा घेतला.या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांची समस्या मार्गी लावण्यासाठी दुपारपर्यंत कोणीही अधिकारी आले नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास या परिसरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची तयारी सुरू केली आहे.

टॅग्स :electricityवीज