लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली प्रेस क्लबतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार सहकार महर्षी अरविंद पोरेड्डीवार यांना जाहीर करण्यात आला असून विशेष पुरस्कारासाठी एंजल देवकुले हिची निवड करण्यात आली आहे.पत्रकारदिनी ६ जानेवारीला दुपारी १२.३० वाजता या पुरस्काराचे वितरण पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कला दालनात करण्यात येणार आहे. यावेळी प्रसिद्ध समाजसेवक महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सहकारासोबतच समाजकार्यात आवड असणारे अरविंद पोरेड्डीवार हे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात ओळखणारे व्यक्तीमत्त्व आहे. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिष्ठेचा असलेला कै. वैकुंठभाई मेहता राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करीत आहे. या बँकेच्या उल्लेखनीय कामगीरीत अरविंद पोरेड्डीवार यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. राज्यात अनेक बँका डबघाईस आल्या असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेने आजही राज्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. एवढेच नव्हे तर सदैव शेतकऱ्यांच्या व कर्मचाºयांशी पाठिशी असलेली ही बँक कर्जमाफीत सुद्धा जिल्ह्यात अग्रेसर राहिली आहे. त्यामुळे या सर्व जडणघडणीत अरविंद पोरेड्डीवार यांचे मार्गदर्शन वेळोवेळी सार्थक ठरत आहे.याशिवाय क्रीडा क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी बजावून गिनीज बुक आॅफ वर्ड रेकार्डमध्ये सिकाई मार्शल आर्ट या प्रकारात आपले नाव कोरणारी एंजल विजय देवकुले हिला विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एंजल या विशेष पुरस्काराची मानकरी ठरली आहे, अशी माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष अरविंद खोब्रागडे, सचिव अनिल धामोडे यांच्यासह प्रेसक्लबच्या पदाधिकाºयांनी दिली आहे.
गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार अरविंद पोरेड्डीवार यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:45 IST
गडचिरोली प्रेस क्लबतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार सहकार महर्षी अरविंद पोरेड्डीवार यांना जाहीर करण्यात आला असून विशेष पुरस्कारासाठी एंजल देवकुले हिची निवड करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार अरविंद पोरेड्डीवार यांना
ठळक मुद्देपत्रकारदिनी होणार सन्मान : एंजल देवकुलेला विशेष पुरस्कार