शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्य कर्मचाऱ्यांचे गडचिरोलीत निदर्शने

By admin | Updated: August 12, 2016 00:46 IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांंच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर

गडचिरोली : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांंच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच विविध तहसील कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. के. चडगुलवार, कार्याध्यक्ष ए. आर. गडप्पा, सरचिटणीस बी. एस. मेश्राम, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा गडचिरोलीचे अध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम रोहणकर, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लतीफ पठाण, सरचिटणीस किशोर सोनटक्के, संघटक चंदू प्रधान यांनी केले. यावेळी नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करा, सातवा वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये सुधारणा करून त्या त्वरीत लागू करा, जानेवारी २०१६ पासून महागाई भत्ता वाढ मंजूर करा, सर्व विभागातील रिक्त पदे भरा, कामगार कायद्यात बदल करू नका, सरसकट सर्व सरकारी आस्थापणांचे खासगीकरण करण्यात येऊ नये, पाच दिवसांचा आठवडा लागू करा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करा आदींसह १५ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे यांनी राज्य कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाकडून हे निवेदन स्विकारले. निदर्शनाच्या वेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. सर्व तालुका मुख्यालयात संघटनेच्या वतीने निदर्शने करून तहसीलदारांनाही निवेदन देण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. के. चडगुलवार यांनी दिली आहे. २ सप्टेंबरला देशव्यापी संप करण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)