शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

गडचिरोली कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:22 IST

जिल्हा केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच गडचिरोली जनरल मर्चंट असोसिएशन यांनी शुक्रवारी गडचिरोली बंदचे आवाहन केले होते. या बंदला गडचिरोली शहरातील सर्वच दुकानदारांनी प्रतिसाद दर्शविला.

ठळक मुद्देआॅनलाईन विक्रीला विरोध : केमिस्ट व मर्चंट असोसिएशनचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच गडचिरोली जनरल मर्चंट असोसिएशन यांनी शुक्रवारी गडचिरोली बंदचे आवाहन केले होते. या बंदला गडचिरोली शहरातील सर्वच दुकानदारांनी प्रतिसाद दर्शविला. औषधी दुकानांसह इतर सर्वच दुकाने बंद असल्याने गडचिरोली शहरात शुकशुकाट दिसून येत होता.इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून आॅनलाईन औषधी विक्रीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. आॅनलाईन औषधी विक्रीचे अनेक दुष्परिणाम आहेत. औषधी हा अतिशय संवेदनशील विषय असल्याने आॅनलाईन औषध विक्रीला अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने विरोध केला आहे. संघटनेच्या या निर्णयाला गडचिरोली जिल्हा केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने पाठींबा दर्शवित शुक्रवारी सर्व औषधी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार औषधी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. संघटनेने बंदबाबतची माहिती दोन दिवसांपूर्वीच दिली असल्याने ज्या नागरिकांना औषध आवश्यक आहे, त्यांनी अगोदरच औषधी खरेदी करून ठेवली. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्हाभरातील शासकीय रूग्णालये, सामान्य रूग्णालये, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नगर परिषद यांच्या अधिनस्त असलेल्या रूग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला पाठविण्यात आले.यावेळी संघटनेचे सतीश विधाते, अविनाश धाईत, निलेश चन्नावार, विपुल चन्नावार, अविनाश कोमट, तुषार चन्नावार, विजय देवकुले, विशाल कुकडे, मदद जीवानी, दिलीप बंडावार, नितीन दोंतुलवार, गोविंद निरंकारी, राजेश इटनकर, दिनेश पुंडे, विजय चौधरी, किशोर म्हस्के, ओमप्रकाश नाकाडे आदी उपस्थित होते.वस्तूंची आॅनलाईन विक्री केली जात असल्याने अनेक दुकानदारांना याचा फटका बसत आहे. एफडीआयचाही मोठा परिणाम दुकानदारांवर होणार आहे. या दोन निर्णयांचा विरोध म्हणून गडचिरोली जनरल मर्चंट असोसिएशननेही शुक्रवारी गडचिरोली बंदचे आवाहन केले होते. गडचिरोली जनरल मर्चंट असोसिएशनमध्ये किराणा, कापड, स्टेशनरी, हार्डवेअर, व्हेरायटी, धान्य दुकान, ईलेक्ट्रिक दुकान आदींचा समावेश होतो. संघटनेच्या आवाहनानंतर गडचिरोली शहरातील सर्वच दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती. या बंदला शहरातील पानठेलाधारकांनीही पाठींबा दर्शवित बंदमध्ये सहभाग नोंदविला. सर्वच दुकाने बंद असल्याने मुख्य बाजारपेठेत संचारबंदी लागल्यागत स्थिती निर्माण झाली होती.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधानांना पाठविले. बंद यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष रवी चन्नावार, सचिव गुरूदेव हरडे, कोषाध्यक्ष फरीद नाथानी, सहसचिव मनोज ठाकूर, उपाध्यक्ष हरीश राठी, दिलीप सारडा, प्रफुल्ल बिजवे, हेमंत राठी, अनिल करपे, किशोर जोगे, उल्हास राठी, बबलू शर्मा, नरेंद्र चन्नावार, हिरानंद राठी, आनंद असावा, दयानंद चौधरी, कासम धंदानी, शौकत धमानी, मुन्ना लालानी, अनिल बालपांडे, सुनील हर्षे, दयानंद चौधरी, किशोर जोगे, विशाल हलवदीया, प्रफुल्ल आंबोरकर, शरफराज शेख, बबलु बरच्छा, अमित नंदा आदींनी सहकार्य केले.ग्रामीण भागातील नागरिकांना फटकागडचिरोली शहरातील दुकाने बंद असल्याबाबतची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना नव्हती. त्यामुळे परिसरातील शेकडो नागरिक वस्तू खरेदीसाठी गडचिरोली येथे आले. मात्र दुकाने बंद असल्याचे बघून ते निराश झाले. सर्वच दुकाने बंद असल्याने नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले. व्यापारी असोसिएशनच्या बंदला पाठींबा दर्शवित पानठेलाधारकांनी सुध्दा पानठेले बंद ठेवले होते. त्यामुळे खर्रा शौकीनांची चांगली अडचण झाली. शहरातील वस्ती भागात मात्र काही पानठेले सुरू होते.

टॅग्स :medicineऔषधंStrikeसंप