शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली, अहेरीत काँग्रेसचे धरणे

By admin | Updated: December 1, 2014 22:53 IST

जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांच्या धानाला भाव, देसाईगंज-गडचिरोली हा रेल्वे मार्ग रोजगार आदी मुद्यांवर जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली व तालुका काँग्रेस कमिटी अहेरीच्यावतीने

लढा कायम ठेवणार : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनावर प्रखर टीकागडचिरोली/अहेरी : जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांच्या धानाला भाव, देसाईगंज-गडचिरोली हा रेल्वे मार्ग रोजगार आदी मुद्यांवर जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली व तालुका काँग्रेस कमिटी अहेरीच्यावतीने आज सोमवारला गडचिरोली व अहेरी येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य शासनावर प्रखर टिका केली.जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावावे, शेतकऱ्यांच्या धानाला ३५०० व ५०० रूपये बोनस देण्यात यावा, जिल्हा विकास प्राधिकरण कार्यान्वित करण्यात यावे, देसाईगंज-गडचिरोल रेल्वे मार्ग निर्माण करण्यात यावे, खनिज संपत्तीवर आधारित उद्योगधंदे सुरू करण्यात यावे, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे आदी मागण्यांना घेऊन आज सोमवारला गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, जिल्हा काँग्रेसचे महासचिव प्रभाकर वासेकर, प्रदेश सदस्य पंकज गुड्डेवार, लोकनेते नामदेवराव गडपल्ल्लीवार, गडचिरोली विधानसभा प्रमुख अतुल मल्लेलवार, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, नगरसेवक नंदू वाईलकर, महेंद्र ब्राम्हणवाडे, मनोहर पोरेटी, सतिश विधाते, अमिता मडावी, विनोद दशमुखे, सोनटक्के, काशिनाथ भडके, दिवाकर निसार, तुळशीराम भोयर, लक्ष्मण कोवे, बाबुराव कुंभारे, पी.टी. मसराम, दर्शना मेश्राम, दर्शना लोणारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.अहेरी येथील धरणे आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष मेहबूब अली यांनी केले. यावेळी शिला चौधरी, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष व्यंकटेश चिलनकर, युवक काँगे्रसचे अहेरी विधानसभा उपाध्यक्ष बालाजी गेडाम, सुरेश मडावी, मधुकर तुंगावार, अशोक आलाम, बब्बू शेख, सलिम शेख, अर्जुन कांबळे, राबीया शेख, इमरान खान, सदाशिव गरगम, सदाशिव दुर्गे, साई पुगलम, मधुकर गोंगले, साई कुकुडकर, निवृत्ती दुर्गे, मुत्यालू कांबळे, शंकरी काटेल, मिना मेश्राम, सुनिता चौधरी, जक्कू कोंडावार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी राज्याला दुष्काळग्रस्त घोषीत करून दर हेक्टरी २५ हजार रूपयाची आर्थिक मदत द्यावी व सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी मेहबूब अली यांनी भाषणातून केली. जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांमध्येही काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. (प्रतिनिधी)