शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी जिल्ह्यासाठी गडचिरोलीत चक्काजाम

By admin | Updated: December 4, 2014 23:08 IST

दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी. या मागणीसाठी अहेरी जिल्हा कृती समिती व राष्ट्रीय जनहितवादी व युवा समिती यांच्यावतीने प्रज्वल

गडचिरोली : दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी. या मागणीसाठी अहेरी जिल्हा कृती समिती व राष्ट्रीय जनहितवादी व युवा समिती यांच्यावतीने प्रज्वल नागुलवार व सुरेश बारसागडे यांच्या नेतृत्वात अहेरी, एटापल्ली तालुक्यातील शेकडो नागरिक गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात दुपारी २ वाजताच्या सुमारास अर्धा तास चक्काजाम आंदोलन केले. यामुळे शहरातील विस्कळीत झाली. जारावंडी, कसनसूर, गट्टा, पेरमिली, जिमलगट्टा, आष्टी या नवीन तालुक्याची निर्मिती करण्यात यावी, एटापल्ली, धानोरा, भामरागड परिसरातून वाहणाऱ्या बांडीया नदीवर मोठे धरण बांधण्यात यावे, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, अहेरी, सिरोंचा या भागातून वाहणाऱ्या नदी, नाल्यांवर धरणे बांधून सिंचनाची सोय करावी, बांबू व इतर गौण खनिजांचे व्यवस्थापन व विक्रीचे अधिकार ग्रामसभांना देण्यात यावे, आदिवासी व गैरआदिवासींच्या शाश्वत विकासाकरीता पेसा कायद्याची त्वरीत अंमलबजावणी करावी, वैयक्तिक व सामुहिक वनहक्क दाव्यांवर प्रक्रिया करून वंचिताना वनहक्क प्रदान करावे, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, जिल्हा मंडळ स्थापन करून स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावे, शिक्षण पध्दतीत सुधारणा करावी, धानाला प्रती क्विंटल ४ हजार रूपये किंमत व ५०० रूपये बोनस देण्यात यावे आदी मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. चक्काजाम आंदोलनानंतर अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती, एटापल्ली व राष्ट्रीय जनहितवादी युवा समितीच्या कार्यकर्त्यांना अटक करून सोडून देण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती व राष्ट्रीय जनहितवादी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बारसागडे, प्रज्वल नागुलवार, अमोल दुर्गे, अरविंद मोहुर्ले, सरिता पुंगाटी, राकेश पुंगाटी, पायल बारसा, निर्मला ओंगुलवार, दीक्षा झाडे यांच्यासह ३०० ते ४०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी या आंदोलनाला भेट देऊन निवेदन स्वीकारले. यावेळी हसनअली गिलानी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने या आंदोलनाला पाठींबा घोषीत केला आहे. (नगर प्रतिनिधी)