शहरं
Join us  
Trending Stories
1
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
2
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
3
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
4
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
5
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
6
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
7
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
8
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
9
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
10
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
11
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
12
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
13
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
14
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
16
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
17
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
18
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
19
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
20
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली होऊ शकते बायोडिझेलचे हब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:28 IST

जिल्ह्यातील गौणखनिज व वनसंपत्तीमुळे हा जिल्हा इतर जिल्ह्यांपेक्षा कितीतरी श्रीमंत आहे. पण या श्रीमंत जिल्ह्याचे नागरिक मात्र सर्वात गरीब आहेत. जिल्ह्यातील बांबू, मोहा, जेट्रोफा, धान, तणस यापासून विविध प्रक्रिया उद्योग, बायोडिझेल बनवून हा जिल्हा समृद्ध होऊ शकतो. त्यासाठी नेते मंडळींनी योग्य प्रयत्न आणि व्हिजन ठेवावे. जिल्हा नियोजन समितीत त्यादृष्टीने योग्य ती तरतूद करावी, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी केली.

ठळक मुद्देगडकरींनी सूचविले समृद्धीचे मार्ग : पायाभूत विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील गौणखनिज व वनसंपत्तीमुळे हा जिल्हा इतर जिल्ह्यांपेक्षा कितीतरी श्रीमंत आहे. पण या श्रीमंत जिल्ह्याचे नागरिक मात्र सर्वात गरीब आहेत. जिल्ह्यातील बांबू, मोहा, जेट्रोफा, धान, तणस यापासून विविध प्रक्रिया उद्योग, बायोडिझेल बनवून हा जिल्हा समृद्ध होऊ शकतो. त्यासाठी नेते मंडळींनी योग्य प्रयत्न आणि व्हिजन ठेवावे. जिल्हा नियोजन समितीत त्यादृष्टीने योग्य ती तरतूद करावी, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी केली.जिल्ह्यातील विविध पायाभूत विकास कामांच्या ई-लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभप्रसंगी अध्यक्षस्थानावरून गडकरी बोलत होते. कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथी होते. यावेळी मंचावर जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, आ.रामदास आंबटकर, आ.बंटी भांगडिया, जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजप अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी, विभागीय आयुक्त संजीवकुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सीईओ डॉ.विजय राठोड, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले, लॉयड्स मेटल्सचे उपाध्यक्ष अतुल खाडीलकर, मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू.आय.एटबॉन, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९२ बटालियनचे कमांडर जिआऊ सिंह, पीकेव्हीच्या कार्यकारी परिषद सदस्य स्रेहा हरडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्र्यांनी गेल्या चार वर्षात गडचिरोली जिल्ह्याला विकासासाठी सर्वाधिक निधी दिल्याचे सांगितले. मी व नितीनजी यांनी संधी मिळेल तेव्हा गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. या जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. पावसाळयात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये १०० बेली-ब्रीज उभारले जातील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.जिल्ह्यामध्ये मुबलक पाणी असतानासुध्दा वन कायद्याच्या अडचणीमुळे मोठे सिंचन प्रकल्प उभे करता येत नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षात विकेंद्रीत सिंचनाकडे लक्ष देताना ११ हजार विहिरी शेतकºयांना मंजूर करण्यात आल्या. विहिरी, शेततळे, छोटे पुल कम बंधारे या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध केली जात आहे. विहिरींसोबतच मोटर पंप, वीज जोडणी दिली जात आहे. कृषी महाविद्यालयात शेतीवर आधारीत प्रयोग केले जातात. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतीतील उत्पादन वाढण्यास मदत होईल.गडचिरोली जिल्ह्यातील पेसा गावांमध्ये आदीवासी सोबतच ओबीसीना देखील सवलती मिळण्याबाबत ट्रायबल अ‍ॅडव्हायजरी कमिटीने काही शिफारशी केल्या आहेत. या शिफारशीच्या माध्यमातून ओबीसींना देखील आरक्षण दिले जाईल. ओबीसींच्या न्याय्य हक्काचे रक्षण केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांंनी शेवटी सांगितले.नितीन गडकरी यांनी कृषि विद्यापीठाच्या चार भिंतीतले संशोधन थेट शेतकºयांच्या शिवारापर्यंत पोहोचले पाहिजे. ज्या गोष्टीमुळे आयात कमी होऊ शकते, मुबलक पैसा मिळू शकते, सामान्यांच्या आयुष्यात समाधान येऊ शकते त्या पिकांच्या संशोधनाला अधिक प्राधान्य देण्याबाबतची सूचना त्यानी केली. सोबतच जिल्ह्यात कोणते प्रयोग केल्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल होईल या संदभार्तील योजना जिल्हा नियोजनातून तयार करण्यात यावी, असेही गडकरी यांनी सुचविले.यावेळी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत झालेल्या विविध कामाचा उहापोह करून हा विकास नाही तर अजून काय? असा सवाल उपस्थित केला.कार्यक्रमादरम्यान खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना केंद्र व राज्य शासन गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचण्यास मदत झाली आहे. मागील ७० वर्षांच्या कालावधीत जेवढा निधी उपलब्ध झाला नाही, तेवढा निधी मागील चार वर्षात उपलब्ध झाला आहे. ही विद्यमान सरकारची मोठी उपलब्धी आहे, असे मार्गदर्शन केले. आ.डॉ. देवराव होळी यांनी मार्गदर्शन करताना जिल्ह्यात उद्योग निर्माण व्हावे, यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. भविष्यात अनेक उद्योग सुरू झाल्याचे चित्र दिसून येईल, असे मार्गदर्शन केले. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकातून जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाºया योजनांची माहिती दिली. संचालन रेणुका देशकर, तर आभार जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी मानले.या कामांचे झाले लोकार्पण आणि भूमिपूजनचंद्रपूर मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात सुरूवातीला मुख्यमंत्री फडणवीस आणि ना.नितीन गडकरी यांनी कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केले. तसेच तिथे मांडलेल्या कृषी प्रदर्शनाचे अवलोकन केले. त्यानंतर मंचावरून विविध कामांचे ई-लोकार्पण आणि ई-भूमिपूजन केले. त्यात गोंडवाना विद्यापीठ मार्गावरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची ईमारत, कठाणी नदीवरील नवीन पुलाचे लोकार्पण तसेच अहेरी येथील प्रस्तावित १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयाचे आणि आरसीपी-२ अंतर्गत रस्ते व पुलांच्या १८ कामांचे ई-भूमिपूजन मंचावरून केले. तसेच गती-२ योजनेअंतर्गत एटापल्ली तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर स्टँडअप इंडियाअंतर्गत २० लाभार्थ्यांना ४० टक्के सबिसडीवरील ट्रक देण्यात आली. त्यातील ५ लाभार्थ्यांना ट्रकची चावी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली. लॉयड्स स्टिलच्या सहकायार्ने आणि खनिकर्म निधीतून हा उपक्रम राबविला जात आहे.जे नागपुरात होऊ शकते ते गडचिरोलीत का नाही?यावेळी बायोडिझेलमधून विमान, जहाज, बस, ट्रक कसे चालू शकतात हे स्पष्ट करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विविध प्रयोगांची माहिती दिली. हे सर्व प्रयोग यशस्वी आहेत आणि ते सप्रमाण आपण नागपुरात केले आहेत. जे नागपुरात यशस्वी होऊ शकते ते गडचिरोलीत का नाही? असा सवालही त्यांनी केला. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या बांबूपासून बायोडिझेल, कागद यासारख्या अनेक गोष्टी तयार होऊ शकतात. त्यासाठी पुढाकार घेण्याबद्दल आपण सहकार नेते सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांना सूचविले होते, असे सांगून यातून या जिल्ह्याचे मागासलेपण दूर होऊन संपूर्ण चित्रच बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विकासाचा वेग वाढलाशासनाने गडचिरोलीतील विकास हा प्राधान्याचा विषय मानला आणि मागील चार वर्षात मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मोठया प्रमाणात निधी उपलब्ध झाला. केंद्रातील योजनांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील पुढाकार घेतला. त्यामुळे विकासाचा वेग वाढला आहे, असे विचार पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी व्यक्त केले.्गडचिरोली जिल्ह्यात १२ हजार कोटींचे रस्ते होत आहेत. हे प्रथमच घडत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करु न रस्त्यांची कामे होत आहेत. जिल्हयात प्रत्येक गावात वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे पालकमंत्री व खासदार नेते यांनी भाषणात सांगितले.