शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

गडचिराेलीकरांनाे, पाणी जपून वापरा नळांना लागणार आता मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 05:00 IST

गडचिराेली शहरातील नळांना पाणी माेजमाप मीटर लावण्याबाबत मागील अनेक वर्षांपासून नगर परिषदेमार्फत प्रयत्न केले जात हाेते. मात्र निधी नसल्याने हा प्लान पुढे ढकलला जात हाेता. अखेर नगर परिषदेने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने नगराेत्थान याेजनेतून तीन काेटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून शहरात आता नळांना मीटर लावले जाणार आहेत. २ काेटी ९१ लाख ३३ हजार ३१० रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.

ठळक मुद्देजेवढा वापर तेवढे बिल, महिनाभरात हाेणार मीटर बसविण्याच्या कामाला सुरुवात

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गडचिराेली शहरातील प्रत्येक नळाला पाणी माेजमाप करणारे मीटर लावले जाणार आहे. याची निविदा काढण्यात आली असून महिनाभरात प्रत्यक्ष मीटर लावण्याच्या कामाला सुरुवात हाेणार आहे. जेवढा पाणी वापर तेवढे पैसे माेजावे लागणार असल्याने पाण्याची बचत हाेण्यास फार माेठी मदत हाेणार आहे. गडचिराेली शहरातील नळांना पाणी माेजमाप मीटर लावण्याबाबत मागील अनेक वर्षांपासून नगर परिषदेमार्फत प्रयत्न केले जात हाेते. मात्र निधी नसल्याने हा प्लान पुढे ढकलला जात हाेता. अखेर नगर परिषदेने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने नगराेत्थान याेजनेतून तीन काेटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून शहरात आता नळांना मीटर लावले जाणार आहेत. २ काेटी ९१ लाख ३३ हजार ३१० रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. नागपूर येथील वाॅटरसी साेल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला काम मिळाले आहे. विशेष सभेत निविदेला मंजुरी मिळाल्याने  कंत्राटदाराला कामाचे आदेश दिले जाऊन महिनाभरात कामाला सुरुवात हाेणार आहे. 

बालटीभर पाण्यासाठी माेजावे लागणार  २० पैसे

राज्यातील बहुतांश माेठ्या शहरांमध्ये नळांना मीटर बसविण्यात आले आहेत. यात आता गडचिराेली शहराचाही समावेश हाेणार आहे. ज्या शहरांमध्ये मीटर लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी प्रती लिटर १ पैसा शुल्क आकारले जात आहे. जवळपास तेवढाच दर गडचिराेली शहरातही आकारला जाण्याची शक्यता आहे. एक बकेट जवळपास २० लिटरची राहते. तेवढे पाणी नळातून घेतल्यास २० पैसे बिलात जाेडले जाणार आहेत. 

- आता वर्षाला सरसकट प्रती जाेडणी दीड हजार रुपये आकारले जात आहेत. यापुढे लाईट बिलाप्रमाणचे रीडिंग करून बिल आकारले जाईल. यात तीन, चार किंवा सहा महिन्यांनी बिल आकारले जाईल. - बांधकाम किंवा अवैध कामासाठी पाण्याचा वापर हाेत असल्यास नगर परिषद दंड म्हणून संबंधित पाण्याचा दर त्या ग्राहकासाठी वाढवू शकते. 

बिलाच्या भीतीने नळांना लागणार आपाेआप ताेट्यानगर परिषदेने अनेकवेळा कारवाई करूनही नळधारक नळांना ताेट्या लावत नव्हते. त्यामुळे हजाराे लिटर पाणी वाया जात हाेते. पाणी कितीही वापरा बिल तेवढेच असल्याने नळधारक ताेट्या लावण्याकडे दुर्लक्ष करीत हाेते. आता मात्र ताेट्या लावल्याशिवाय पर्याय नाही. 

अनेक नळधारक दुसऱ्या मजल्यावर पाणी चढविण्यासाठी टिल्लू पंप लावत हाेते. आता टिल्लूपंपाचा वापर बंद हाेईल. एखादा व्यक्ती टिल्लूपंप लावत असेल तर त्याला पाण्याच्या वापरएवढे बिल द्यावे लागणार आहे. 

जे नागरिक पाण्याचा वापर कमी करतील त्यांना मात्र कमी बिल येऊन त्यांच्या पैशांची बचत हाेईल. जे नागरिक पाण्याचा अपव्यय करतील, त्यांना अधिकचे बिल भरावे लागणार आहे.

 

टॅग्स :Waterपाणी