अहेरी : माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या धर्मपत्नी व भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष स्नेहादेवी आत्राम यांच्यावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अहेरी येथील राजघाटावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र हर्षवर्धनराव आत्राम यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम, रविंद्रबाबा आत्राम, भाग्यश्री आत्राम-हलगेकर, जगन्नाथराव आत्राम, रामेश्वरबाबा आत्राम, दौलतराव महाराज, क्रिष्णाबाबा आत्राम, क्रिष्क्रींदरराव आत्राम, भूजंगराव महाराज, बबनराव खंडाते, डी. सी. मडावी, सुधाकर खंडाते, बबन टेकाम, नारायणसिंह कांचनदेवी राजे, विरेंद्र शहा, आदित्य शहा, राजमाता राजेश्रीदेवी, ऋतूराज हलगेकर, अवधेशराव आत्राम आदी राज परिवारातील सदस्यांसह चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील अनेक चाहते उपस्थित होते. तत्पूर्वी धर्मरावबाबा आत्राम यांच्या निवासस्थानी खासदार अशोक नेते, आमदार क्रिष्णा गजबे, आमदार देवराव होळी, माजी आमदार पेंटारामा तलांडी, दीपक आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, अरविंद पोरेड्डीवार, सुरेश पोरेड्डीवार, बंडोपंत मल्लेलवार, प्रकाश ताकसांडे, रवी वासेकर, जगन्नाथ पाटील बोरकुटे, संजय निखारे, बाबा हाशमी, चंद्रपूर राकाँचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, अमिन लालानी, युनूस शेख, संदीप ठाकूर, सोपानदेव म्हशाखेत्री, बाबूराव कोहळे, विनोद आकनपल्लीवार, अब्बास बेग, चिल्लयाजी मद्दीवार, डॉ. कन्ना मडावी, यशवंत दोंतुलवार, मुत्तन्नाजी दोंतुलवार, सुकमुद्दीन हकीम, बबलू हकीम, सब्बर मोगल बेग, जि.प. सभापती अजय कंकडालवार, इरफान पठाण, सुरेंद्र अलोणे, शैलेश पटवर्धन, अहेरीचे सरपंच गंगाराम कोडाप, विलास सिडाम, बबलू सडमेक आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. स्नेहादेवी यांची अंत्ययात्रा राजवाड्यातून विश्वेश्वरराव महाराज चौक, पोलीस स्टेशन, मज्जीद चौक, दानशूर चौक मार्ग राजघाटावर पोहोचली. अहेरी व परिसरात रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.
हजारो नागरिकांच्या उपस्थितीत स्नेहादेवींवर अंत्यसंस्कार
By admin | Updated: March 30, 2015 01:29 IST