शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

निधीचा ओघ वाढला मात्र कामे रेंगाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 23:02 IST

मागील दोन वर्षात नगर परिषदेला निधीचा ओघ सुरू झाला आहे. मात्र प्रत्यक्षात कामांना सुरूवात झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. नुकताच विविध योजनांतर्गत नगर परिषदेने दोन कोटी रूपयांच्या कामांची निविदा काढली आहे. सदर कामे सुरू होण्यास आणखी किती दिवसाचा कालावधी लागेल. याबाबत नागरिक अनभीज्ञ आहेत.

ठळक मुद्देनिधी पडून : नियोजनात गडचिरोली नगर परिषद माघारली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील दोन वर्षात नगर परिषदेला निधीचा ओघ सुरू झाला आहे. मात्र प्रत्यक्षात कामांना सुरूवात झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. नुकताच विविध योजनांतर्गत नगर परिषदेने दोन कोटी रूपयांच्या कामांची निविदा काढली आहे. सदर कामे सुरू होण्यास आणखी किती दिवसाचा कालावधी लागेल. याबाबत नागरिक अनभीज्ञ आहेत.नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन पाळत राज्याचे मुख्यमंत्री, वित्तमंत्री यांनी गडचिरोली नगर परिषदेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्येही चर्चेचा विषय बनला आहे. मात्र या निधीचे नियोजन करण्यात नगर परिषदेचे पदाधिकारी व सदस्य अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. काही कामांच्या निविदा निघाल्या आहेत. तर काही निधीचे नियोजन करण्याचे काम सुरूच आहे. नगर परिषदेच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते.नगर परिषदेतून निघालेली फाईल कधीकधी जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक महिने पडून राहते. मात्र त्याचा पाठपुरावा नगर परिषद पदाधिकाऱ्यांकडून घेतला जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उपलब्ध निधीबाबतचे जरी रेकॉर्ड नगर परिषद तोडत असली तरी कामे मात्र शुन्य असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.नागरिकांच्या प्रश्नांमुळे नगरसेवक त्रस्तकामे मंजूर झाल्याची माहिती नगरसेवक नागरिकांना मागील दोन वर्षांपासून देत आहेत. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली नाही. यामुळे नागरिक कामाबाबत विचारणा करीत आहेत. याचे उत्तर देताना नगरसेवकांच्या नाकीनऊ येत आहे. दुसरीकडे केबल टाकण्यासाठी रस्ते फोडले जात आहेत. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये नागरिक पडून अपघात होत आहेत. खड्डे हाच विकास होय काय, असा प्रश्न नागरिकांकडून नगरसेवकांना उपस्थित केला जात आहे. यामुळे नगरसेवकही त्रस्त आहेत.पुन्हा दोन कोटींच्या कामांना मंजुरीगडचिरोली शहरातील नागरी, अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना इतर वस्ती सुधार योजना, नगर परिषदेचा निधी व रस्ता अनुदान योजनांमधून दोन कोटी रूपयांची कामे केली जाणार आहेत. याबाबतची निविदा सुध्दा काढण्यात आली आहे. या कामांमध्ये रस्ता, नाली बांधकाम यांचा प्रामुख्याने समावेश आहे. जुनीच कामे अजूनपर्यंत सुरू झाली नाही. त्यामुळे नवीन कामांना काधी सुरूवात होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.