शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत पाच वर्षांपासून किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच निधी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 12:39 IST

आरमोरी तालुक्यातील वैरागड किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी पुरातत्व विभागाकडून निधी मंजूर केला जातो. मागील पाच वर्षांपासून बहुतांश निधी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची डागडुजी करण्यावरच खर्च केला जात आहे.

ठळक मुद्देआतील भाग नष्ट होण्याच्या मार्गावरवैरागडचा किल्ला

आॅनलाईन लोकमतवैरागड : आरमोरी तालुक्यातील वैरागड किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी पुरातत्व विभागाकडून निधी मंजूर केला जातो. मागील पाच वर्षांपासून बहुतांश निधी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची डागडुजी करण्यावरच खर्च केला जात आहे. त्यामुळे नागरिकही आश्चर्यचकीत झाले आहेत.वैरागड गावाच्या उत्तरेला १२ एकर जागेत किल्ल्याचे बांधकाम झाले आहे. इसवी सन १२ व्या शतकात तत्कालीन गोंड राजा बाबाजी बल्लाळशाहने वैरागड येथे असलेल्या हिऱ्याच्या खाणींच्या संरक्षणार्थ सदर किल्ला बांधला आहे, असा उल्लेख इतिहासात मिळतो. एवढा मोठा कालखंड उलटून गेल्यानंतर आजही किल्ल्याचे तट, बुरूज कायम आहेत. बरेच वर्ष किल्ल्याच्या देखभालीकडे पुरातत्व विभागाने लक्ष न दिल्याने किल्ल्याचा बराच भाग भूईसपाट झाला. ऐतिहासीक वास्तू पुन्हा नव्याने निर्माण करणे शक्य नसल्याने या दुर्मिळ वास्तूची देखभाल करणे आवश्यक असताना किल्ल्याच्या देखभाालीकडे पुरातत्व विभाग पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नसल्याचे दिसून येते. मागील पाच वर्षांपासून दरवर्षी किल्ल्याच्या देखभाल व दुरूस्तीसाठी पुरातत्व विभागाकडून निधी मंजूर केला जात आहे. मात्र यातील बहुतांश निधी केवळ प्रवेशद्वाराच्या दुरूस्तीवरच खर्च केला जात आहे. किल्ल्याच्या आत तट, बुरूज आहेत. त्यांचीही दुरूस्ती होणे आवश्यक आहे. किल्ल्याच्या आंतरभागातील इतरही वास्तूंची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे, दुरूस्तीचे काम नेमक्या कोणत्या कंत्राटदाराला दिले जाते, हे गोपनिय ठेवले जाते. त्यामुळे पुरातत्व विभाग व कंत्राटदार यांची मिलिभगत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.