शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राकाँंतर्फे इंधन दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:28 IST

मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल, गॅस आदींसह जीवनावश्यक वस्तूंचे दर झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून शासनाने इंधन दरवाढ व महागाई नियंत्रणात आणावी, अशी मागणी करीत केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांचा निषेध करून शासनाला निवेदन पाठविले.

ठळक मुद्देशासनाला निवेदन : महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल, गॅस आदींसह जीवनावश्यक वस्तूंचे दर झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून शासनाने इंधन दरवाढ व महागाई नियंत्रणात आणावी, अशी मागणी करीत केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांचा निषेध करून शासनाला निवेदन पाठविले.सिरोंचा येथे राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने बुधवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. गेल्या वर्षभरात गॅसच्या किंमती १९ वेळा वाढल्या. तर पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढवून किंचित कमी केल्या जात आहेत. पेट्रोल ८६ रूपये तर डिझेल ७३ रूपयांच्या आसपास आहे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ करून सरकार सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत आहे. सध्या जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे शासनाने इंधन दरवाढ मागे घ्यावी, अन्यायी कर मागे घेऊन दरवाढ कमी करावी, पेट्रोल, डिझेलचे दर दररोज ठरविणे बंद करावे, गॅसचे दर कमी करावे, अशी मागणी करण्यात आली.शासनाच्या जनविरोधी धोरणामुळे भाववाढ झाली आहे, असा आरोपही राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर राकाँचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी यांच्या नेतृत्वात भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, तालुका उपाध्यक्ष सत्यम पिडगू, सचिव उज्ज्वल तिवारी, पालारपू नारायण, गर्कापेठाचे माजी सरपंच आसम डोबा, येमा मलय्या, राकाँ सेवा दलाचे तालुकाध्यक्ष संतोष नागुला, गर्कापेठाचे माजी उपसरपंच दुर्गम सोमय्या, कैलास जिमडे व राष्टÑवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.