शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

टीएचओ कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 23:17 IST

ग्रामीण व दुर्गम भागात राहून आरोग्य सेवेचे काम करणाºया आशावर्करला अत्यल्प मानधन दिले जाते. या मानधनावर आशांना सेवा द्यावी लागते, असे असतानाही एप्रिल महिन्यापासून त्यांचे मानधन थकीत आहे.

ठळक मुद्देआयटकचे घेराव आंदोलन : एप्रिल महिन्यापासून आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे मानधन थकित

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : ग्रामीण व दुर्गम भागात राहून आरोग्य सेवेचे काम करणाºया आशावर्करला अत्यल्प मानधन दिले जाते. या मानधनावर आशांना सेवा द्यावी लागते, असे असतानाही एप्रिल महिन्यापासून त्यांचे मानधन थकीत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आशावर्कर्सनी आयटकच्या नेतृत्त्वात भामरागड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयावर शनिवारी धडक मोर्चा काढून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला घेराव घातला.आशावर्करमुळे ग्रामीण भागातील बालमृत्यू, मातामृत्यू दर कमी झाला आहे. नागरिकांना प्रवृत्त केल्यामुळे ते रूग्णालयात जात आहेत. परंतु आशा व गटप्रवर्तकांना अल्प मानधन देऊन त्यांना वेठबिगारीसारखे वागविले जात आहे. एप्रिल २०१७ पासून त्यांना अद्यापही मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या आशा व गटप्रवर्तकांनी आयटकचे नेते विनोद झोडगे यांच्या नेतृत्त्वात आरेवाडा मार्गावरील किसान भवनातून शनिवारी दुपारी मोर्चा काढून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला घेराव घातला. परंतु कार्यालयात तालुका आरोग्य अधिकारी, बीसीएम व अकाऊंटंट गैरहजर राहिल्याने कर्मचाºयांनी कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले तेव्हा एका कर्मचाºयाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मेश्राम यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. डॉ. मेश्राम यांनी संघटनेला येत्या दोन दिवसांत सर्व थकीत मानधन देऊ, असे आश्वासन दिले. तसेच सप्टेंबर महिन्यापासून पुढे वेळेवर मानधन देण्याचे मान्य केले. तसेच मलेरिया हेडवरील दोन वर्षापासूनचा निधी आला नसल्याने याचाही पाठपुरावा करण्याचे सांगितले.या आंदोलनाचे नेतृत्त्व विनोद झोडगे, तालुकाध्यक्ष भूमिका कांबळे, सोनिया बावणे, छाया शेडमाके, महानंदा आत्राम, किरण कुमरे, पुष्पा तलांडे यांनी केले. याप्रसंगी तालुक्यातील शेकडो आशा व गटप्रवर्तक उपस्थित होते.गटप्रवर्तकांची चार पदे रिक्तभामरागड तालुका दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. या तालुक्यात आरोग्यसेवा पोहोचविणे अनेकदा अडचणीचे ठरते. शिवाय वेळीच रूग्णाला औषधोपचार करण्यातही अडचणी येतात. असे असतानाही तालुक्यातील चार गटप्रवर्तकांची पदे रिक्त आहेत. संघटनेने सदर बाब तालुका आरोग्य अधिकारी मेश्राम यांच्या लक्षात आणून दिली असता, याबाबतचा पाठपुरावा जिल्हा आरोग्य अधिकाºयांकडे केला असल्याचे सांगितले.