शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

मोफत गणवेश योजनेचे नियोजन थंडबस्त्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:26 IST

राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत गतवर्षी प्रमाणे यंदाही मोफत गणवेश योजना राबविण्यात येणार आहे. मात्र सदर योजना यंदा कशा पद्धतीने राबवावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून जि.प. प्रशासनाला अद्यापही प्राप्त झाल्या नाही.

ठळक मुद्देयंदा दिरंगाई टळणार? : दोन आठवड्यानंतर शैक्षणिक सत्राची सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत गतवर्षी प्रमाणे यंदाही मोफत गणवेश योजना राबविण्यात येणार आहे. मात्र सदर योजना यंदा कशा पद्धतीने राबवावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून जि.प. प्रशासनाला अद्यापही प्राप्त झाल्या नाही. त्यामुळे सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबतचे शिक्षण विभागाचे नियोजन थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने गतवर्षी मोफत गणवेश योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत शालेय गणवेश उपलब्ध करून दिला जातो. गतवर्षी शासनाच्या आदेशानुसार गणवेशाच्या अनुदानाची रक्कम अदा करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांचे संयुक्त बँक खाते काढण्यात आले. मात्र बँक व शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे तसेच लाभार्थ्यांच्या उदासीनतेमुळे बँक खाते काढण्याची प्रक्रिया बरेच दिवस लांबली होती. ‘आधी गणवेश खरेदी करा, नंतर अनुदान मिळेल’ असे सरकारचे धोरण गतवर्षी असल्याने ही योजना विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापकांसह शिक्षकांसाठीही कटकटीची ठरली होती.सन २०१८-१९ हे शैक्षणिक सत्र २६ जून २०१८ पासून सुरू होणार आहे. विद्यार्थी शाळा प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या शैक्षणिक सत्रातही समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना योजनेअंतर्गत गणवेश उपलब्ध करून द्यावयाचे आहेत. मात्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना न आल्याने जि.प. प्रशासनाच्या वतीने नियोजनाची कार्यवाही सध्या थंडबस्त्यात आहे.यासंदर्भात प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी उरकुडे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे याबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेता आली नाही.विद्यार्थ्यांचे खाते उघडण्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निर्देशमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने गणवेश योजनेबाबत जि.प. शिक्षण विभागाला आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना मिळत असतात. मात्र आगामी शैक्षणिक सत्रात ही योजना राबविण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या नाही. असे असले तरी जिल्ह्यातील सर्व पं.स. स्तरावरील गटशिक्षणाधिकाºयांनी बँक खाते नसलेल्या विद्यार्थ्यांचे खाते उघडावेत, असे निर्देश सर्व बीओंना मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाºयांमार्फत देण्यात आले आहे. तसे पत्र एप्रिल महिन्यात देण्यात आले. इयत्ता पहिली व इतर खासगी शाळांमधून जि.प.च्या शाळेत नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याची कार्यवाही सुरू आहे.गतवर्षी ६१ हजार विद्यार्थ्यांना मिळाला योजनेचा लाभसर्वशिक्षा अभियानांतर्गत गतवर्षी सन २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात बाराही तालुक्यातील एकूण १ हजार ५७३ शाळांमधील एकूण ६३ हजार ५७८ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ द्यावयाचा होता. यापैकी प्रत्यक्ष गणवेश खरेदी केलेल्या ६१ हजार १०८ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. त्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम वळती करण्यात आली, अशी माहिती जि.प. शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.