शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

१२ लाख शेतकरी साधणार मोफत संवाद

By admin | Updated: November 3, 2015 00:43 IST

बीएसएनएलने महाकृषी संचार योजनेंतर्गत शेतकरीवर्गासाठी तीन वेगवेगळे प्लॅन सादर केले होते. १ नोव्हेंबरपासून या तिन्ही प्लॅनचे एकत्रिकरण केले आहे.

कृषी प्लॅनचे एकत्रिकरण : नवीन योजनेचा शेतकऱ्यांना लाभगडचिरोली : बीएसएनएलने महाकृषी संचार योजनेंतर्गत शेतकरीवर्गासाठी तीन वेगवेगळे प्लॅन सादर केले होते. १ नोव्हेंबरपासून या तिन्ही प्लॅनचे एकत्रिकरण केले आहे. त्यामुळे राज्यभरातील १२ लाख शेतकरी एकमेकांसोबत मोफत संवाद साधू शकणार आहेत. शेतकऱ्यांना आपसात चर्चा करता यावी, त्याचबरोबर त्यांच्यावर मोबाईल बिलाचा अधिक भार पडू नये, या उद्देशाने बीएसएनएलने महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यात २००९ साली महाकृषी संचार योजना सुरू केली होती. या योजनेचे राज्यात एकूण १३ लाख ग्राहक आहेत. ही योजना तीन टप्प्यात राबविण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात १०९ रूपयात १ जीबी डाटा, ६ तास बीएसएनएलवरून बीएसएनएल व दीड तास बीएसएनएल ते अदर तसेच ५०० एसएमएस पाठविता येत होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १०८ चा प्लॅन सुरू करण्यात आला. या प्लॅनमध्ये बीएसएनएल ते बीएसएनएल ३ तास, इतर नेटवर्क २ तास, ४०० एसएमएस व २०० एमबी डाटा देण्यात येत होता. त्यानंतर २०१५ मध्ये १२८ चा प्लॅन आणला. सदर प्लॅनमध्येही ३ तास बीएसएनएल ते बीएसएनएल व १ तास इतर नेटवर्कवर बोलता येत होते. त्याचबरोबर ३०० एसएमएस व २०० एमबी डाटा दिला जात होता. या तिन्ही प्लॅनमध्ये पहिला १०९ रूपयांचा प्लॅन सर्वात लाभदायक होता. मात्र बीएसएनएलने १ नोव्हेंबरपासून या तिन्ही प्लॅनचे एकत्रिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन प्लॅनमध्ये कृषी सीमच्या सर्व ग्राहकांना १४१ रूपयांचा इजी रिचार्ज मारावा लागणार आहे. यामध्ये ४५० मिनीटे बीएसएनएल ते बीएसएनएल व ५० मिनीटे इतर नेटवर्कवर बोलता येणार आहे. त्याचबरोबर ४०० एमबी डाटा व ५०० एसएमएस पाठविता येणार आहेत. यानंतर मात्र प्रती मिनीट ५० पैसे दर आकारला जाणार आहे. यापूर्वी एका कृषी प्लॅनमधील व्यक्तींना मोफत बोलता येत होते. मात्र दुसऱ्या कृषी प्लॅनमधील व्यक्तीला फोन करण्यासाठी मिनीटे कपात केली जात होती. यानंतर मात्र या तिन्ही कृषी प्लॅनमधील मोबाईलधारकांना १ नोव्हेंबरपासून मोफत बोलता येणार आहे. (प्रतिनिधी)