शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जमीन हस्तांतरणाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:24 IST

गडचिरोली शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या अडपल्ली येथील शेतकऱ्यांची १९२ एकर जमीन विद्यापीठासाठी खरेदी केली जाणार आहे. त्यापैकी १०० एकर जमिनीच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

ठळक मुद्देगोंडवाना विद्यापीठ : १९२ पैकी १०० एकर जमिनीचा लवकरच मिळणार ताबा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या अडपल्ली येथील शेतकऱ्यांची १९२ एकर जमीन विद्यापीठासाठी खरेदी केली जाणार आहे. त्यापैकी १०० एकर जमिनीच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.विद्यापीठाने चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थान परिसरातील वन जमीन मिळावी, यासाठी अर्थ व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात नियोजन आराखडा तयार केला. परंतु हा प्रयत्न फसला. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने कुलगुरू डॉ. कल्याणकर यांच्या पुढाकारात शहरालगत असलेल्या मूल मार्गावरील कोटगल, पुलखल, कनेरी, पारडी परिसरात जमिनीचा शोध घेतला. त्यानंतरही धानोरा मार्गावरील लांझेडा परिसरातही जमिनीचा शोध घेण्यात आला. येथेही पुरेशा प्रमाणात जमीन उपलब्ध होऊ शकली नाही.हे प्रयत्न करुन थकल्यानंतर गोगाव येथील मूळचे रहिवासी असलेले डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्याशी कुलगुरूंनी संपर्क साधून जमीन विद्यापीठाला देण्याची मागणी केली, ते तयार झाले. त्यानंतर कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी अडपल्ली परिसरात ज्या शेतकºयांच्या जमिनी आहेत त्या सर्व शेतकºयांशी वैयक्तिक संपर्क करून विद्यापीठाला जमीन देण्याची विनंती केली. त्यांनी कुलगुरूंची विनंती मान्य करीत जमीन देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने नियोजन आराखडा तयार करून राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सादर केला. दरम्यानच्या काळात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या जमिनीची पाहणी करून तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली व निधीही उपलब्ध करून दिला.विद्यापीठ प्रशासनाने अडपल्ली परिसरातील १९२ एकर जमिनीचे हस्तांतर करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यापैकी पहिल्या टप्यात १०० एकर जमिनीची संपूर्ण कार्यवाही पार पाडण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरीत जमिनीची कार्यवाही करण्यात येणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ