गाेंडपिपरीमार्गे आष्टी येथे सुगंधित तंबाखू आणला जात असल्याची गाेपनीय माहिती एसडीपीओ पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार या पथकाने आष्टी ग्रामपंचायतीजवळ सापळा रचला हाेता. चारचाकी वाहन ग्रामपंचायतीजवळ येताच वाहन थांबवून तपासणी केली असता, वाहनात सुगंधित तंबाखू आढळून आली. वाहन जप्त करण्यात आले. तसेच याप्रकरणी राजेंद्र जाेगेश्वर तिवारी (५७, रा. काेठारी, ता. बल्लारपूर), जितेंद्रसिंग (५०), हरीश ठक्कर (४०, दाेघेही रा. बामणी, ता. बल्लारपूर) व श्रीनिवास गाेतय्या राघम (४२, रा. आष्टी) या चार जणांविराेधात अन्नसुरक्षा मानके कायदा २००६ व अधिनियम २०११ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास एसडीपीओ अमाेल ठाकूर, आष्टीचे ठाणेदार कुमारसिंग राठाेड यांच्या मार्गदर्शनात पीएसआय वैशाली कांबळे करीत आहेत.
पावणेतीन लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:40 IST