शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड चौथ्या दिवशीही पुराच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:53 IST

छत्तीसगडकडून इंद्रावती नदीचा प्रवाह वाढल्याने पर्लकोटाचे पाणी पुढे जाण्याऐवजी गावात शिरले. त्यामुळे सोमवारीही २५ ते ३० टक्के भामरागड पाण्यात होते. घरांसोबतच या भागातील नागरिकांच्या शेतातील पीकही खरडून गेले आहे. शेतात अडकलेल्या काही नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने रिस्क बोटने जाऊन सुरक्षितपणे बाहेर काढले. या भागातील पाऊस मंदावला असला तरी छत्तीसगडकडून येणारी इंद्रावती नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहात आहे.

ठळक मुद्देअनेक कुटुंबांची राहोटी घराबाहेर : प्रशासनाने केली गावकऱ्यांची सर्व सोय

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : गेल्या चार दिवसांपासून पर्लकोटा नदीचे पाणी भामरागडमध्ये शिरल्याने बेघर झालेल्या नागरिकांना प्रशासनाने आश्रय देत त्यांची राहण्याची व जेवणाची आणि पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे. पुराचे पाणी अजूनही गावातून निघालेले नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.छत्तीसगडकडून इंद्रावती नदीचा प्रवाह वाढल्याने पर्लकोटाचे पाणी पुढे जाण्याऐवजी गावात शिरले. त्यामुळे सोमवारीही २५ ते ३० टक्के भामरागड पाण्यात होते. घरांसोबतच या भागातील नागरिकांच्या शेतातील पीकही खरडून गेले आहे. शेतात अडकलेल्या काही नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने रिस्क बोटने जाऊन सुरक्षितपणे बाहेर काढले. या भागातील पाऊस मंदावला असला तरी छत्तीसगडकडून येणारी इंद्रावती नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहात आहे. त्यामुळे भामरागडमधील परिस्थिती गेल्या चार दिवसांपासून ‘जैसे थे’ आहे.आतापर्यंत ६०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात महसूल व पोलीस विभागाला यश आले आहे. बºयाच कुटुंबांचे कपडे, घरातील सामान वाहून गेले. चार दिवसांपासून दूरध्वनी, भ्रमणध्वणी, वीज पुरवठा खंडित होता. तहसीलदार कैलास अंडिल यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्याने दरम्यान सोमवारी भ्रमणध्वनी आणि वीज पुरवठा सुरू करण्यात यश आले.तहसीलदार अंडिल यांच्यासह एसडीपीओ डॉ.कुणाल सोनवाने यांनी स्वत: हजर राहून ज्या-ज्या ठिकाणी लोकांना आश्रय दिला त्या ठिकाणी जेवणाची, राहण्याची व्यवस्था पाहिली. तसेच प्रयास महिला स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकारी शीला येंपलवार, भारती इष्टम, प्रीती मडावी, सुनंदा आत्राम, गौरी उईके, तारा मडावी, कुटो मडावी, अर्पणा सडमेक, ठुगे मडावी, निर्मला सडमेक आदींनी देखील हातभार लावला.अजूनही ते लोक पूरग्रस्त नाही!भामरागडवासिय पुरामुळे अभूतपूर्व अशा बिकट परिस्थितीत असताना अद्याप लोकप्रतिनिधींनी तिथे जाऊन पूरग्रस्तांना दिलासा दिलेला नाही. यापूर्वीच्या पुरानंतर आ.अम्ब्रिशराव आत्राम यांनी भेट दिली होती, पण आताच्या भिषण परिस्थितीनंतर पालकमंत्र्यांनी येऊन पूरग्रस्तांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा अशी अपेक्षा केली जात आहे. विशेष म्हणजे अजूनही हे पूरग्रस्त शासकीय रेकॉर्डमध्ये ‘पूरग्रस्त’ नाहीत. त्यामुळे ते निकषानुसार मिळणाºया मदतीपासून वंचित आहेत.

टॅग्स :floodपूर