शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

चार दुकाने फोडली

By admin | Updated: February 19, 2016 01:37 IST

अज्ञात चोरट्यांनी बुधवारच्या रात्री गडचिरोली शहरातील चार दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून दुकानांमधील रोख

गडचिरोली : अज्ञात चोरट्यांनी बुधवारच्या रात्री गडचिरोली शहरातील चार दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून दुकानांमधील रोख रकमेची चोरी केली. त्याचबरोबर दुकानातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. एकाच महिन्यात सलग दुसऱ्यांदा दुकानांमध्ये चोरी झाल्याने व्यावसायिक धास्तावले आहेत. चामोर्शी मार्गावरील शुभम जुगल किशोर काबरा यांच्या मालकीच्या हनुमान ट्रेडिंग कंपनी या किराणा दुकानाचे अगदी समोरच्या शटरचे कुलूप तोडले व आतमध्ये प्रवेश केला. काऊंटरमध्ये ठेवलेली ५ हजार ५०० रूपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. त्याचबरोबर पॅनकार्ड, एटीएम कार्ड, मतदान कार्ड सुद्धा चोरून नेले. त्याचबरोबर दुकानातील सामान अस्थाव्यस्त फेकून दिले. त्यामुळे हजारो रूपयांचे नुकसान झाले. रेड्डी गोडाऊन परिसरातील साई प्रोव्हिजन या किराणा दुकानाचे शटर तोडून दुकानातील ४ हजार रूपयांची रोख रक्कम लंपास केली. याच परिसरातील नारायण मेडिकलचेही कुलूप तोडून ४०० रूपये चोरून नेले. रामनगर येथील पंचशील बौद्ध विहाराजवळ असलेल्या माधुरी किराणा दुकानाचे सर्वप्रथम मागचे दार तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर दरवाजा विटा लावून बुजविण्यात आला असल्याचे चोरट्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी समोरचेच दार तोडून दुकानामध्ये प्रवेश केला. दुकानातील ६०० रूपये नगद रकमेची चोरी केली. दुकानदारांनी याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केल्यानंतर पोलिसांनी श्वान पथक घटनास्थळावर आणले. त्याचबरोबर फिंगर प्रिंटही घेतल्या आहेत. मात्र सायंकाळपर्यंत एकाही चोराला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे (नगर प्रतिनिधी)व्यावसायिकांमध्ये धास्ती४एका महिन्याच्या अंतराने सलग दुसऱ्यांदा दुकान फोडण्याची घटना घडली आहे. एक महिन्यांपूर्वी मूल मार्गावरील भारत गॅस व एचपी गॅस एजन्सी तसेच अष्टभूजा केमिकल्स कंपनीच्या कार्यालयात चोरट्यांनी सव्वा लाखांच्या वर रक्कम लांबविली होती. त्यानंतर आता महिन्याच्या अंतरावरच पुन्हा दुकानफोडीच्या घटना वाढल्या आहे. चोरीच्या एकाही प्रकरणातील आरोपी पोलिसांना गवसलेले नाही.आरोपी सीसीटीव्हीत कैद४हनुमान ट्रेडिंग कंपनी या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. यातील कॅमेऱ्यांमध्ये चोरटे कैद झाले आहेत. मात्र रात्र अंधार असल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज स्पष्ट नाहीत. सदर फुटेज स्पष्ट करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. एक महिन्यापूर्वीही गॅस एजन्सीमध्ये झालेली चोरी शटरचे कुलूप तोडूनच झाली आहे. बुधवारच्या चोरीतही कुलूप तोडले.त्यामुळे एक महिन्यापूर्वी चोरी करणारेच चोरटे असावे, अशी शक्यता आहे.