शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

चार नगर पंचायतीसाठी आविसंने कंबर कसली

By admin | Updated: October 24, 2015 01:14 IST

अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी अपक्ष आ. दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ...

मुलचेरात काँग्रेस सोबत आघाडी : दीपक आत्राम यांची प्रतिष्ठा पणालागडचिरोली : अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी अपक्ष आ. दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आदिवासी विद्यार्थी संघाने पुन्हा निवडणुकीच्या मैदानात कंबर कसली आहे. सिरोंचा, एटापल्ली, अहेरी व मुलचेरा येथे आविसंने उमेदवार रिंगणात उतरविले आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी आ. दीपक आत्राम यांनी स्वत: मतदारांसमोर जाणे पसंत केले असून एटापल्ली येथे १४ जागांवर आदिवासी विद्यार्थी संघ मैदानात आहे. तर सिरोंचा येथे १७ जागा आविसं लढवित आहे. अहेरी येथे ५ जागांवर आविसंने उमेदवार उतरविले असून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्या आग्रहामुळे आविसंने मुलचेरा येथे काँग्रेस सोबत नगर पंचायत निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. या नगर पंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दीपक आत्राम यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित असल्याचे प्रदेश काँग्रेसच्या सूत्रांनीही लोकमतशी बोलताना स्पष्ट केले आहे.प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे चांगले संबंध दीपक आत्राम यांच्याशी मुख्यमंत्रिपदाच्या काळात राहिलेले आहे. त्यामुळे आत्राम यांच्या प्रवेशात आता कोणतीही अडचण येणार नाही, असा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीत दीपक आत्राम यांनी मिळविलेले मताधिक्य पक्षासाठी केव्हाही फायदेच राहील, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे आविसं आगामी निवडणुकीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)