शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी व आलापल्लीत चार लाखांची दारू जप्त

By admin | Updated: February 1, 2017 00:44 IST

आष्टी पोलिसांनी कालिनगर जंगलातून व अहेरी पोलिसांनी प्राणहिता नदी पात्रात वांगेपल्ली घाटावरून सुमारे चार लाख रूपये किमतीची मोहफुलाची दारू जप्त केली आहे.

साहित्य ताब्यात : कालिनगर व वांगेपल्ली घाटावर कारवाईआष्टी/आलापल्ली : आष्टी पोलिसांनी कालिनगर जंगलातून व अहेरी पोलिसांनी प्राणहिता नदी पात्रात वांगेपल्ली घाटावरून सुमारे चार लाख रूपये किमतीची मोहफुलाची दारू जप्त केली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कालिनगर जंगल परिसरात मोहफुलाची दारू निर्माण केली जात असल्याची माहिती आष्टी पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी खात्री करून जंगल परिसरात शोध घेतला असता, जंगल परिसरात २५ प्लास्टिक ड्रममध्ये मोहफूल सळवा आढळून आला. या मोहफूल सळव्याची अंदाजे किमत ३ लाख ३६ हजार रूपये होते. त्याचबरोबर २५ ड्रमची किमत १४ हजार ४०० रूपये एवढी होते. सदर कारवाई पोलीस निरिक्षक दीपक लकडे, पोलीस उपनिरिक्षक संदीप कापडे, सहायक फौजदार फुलझेले, नायक पोलीस शिपाई मिलिंद ऐलावार, भुदेव झाडे, सखाराम माने, विनोद गौरकार यांनी केली. अहेरी पोलिसांना प्राणहिता नदी पात्रात वांगेपल्ली घाटाजवळ दारूभट्टी आहे, अशी माहिती प्राप्त झाली. त्यानुसार अहेरी पोलीस ठाण्याचे निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी दुपारी ३ वाजता धाड टाकली. या ठिकाणी २० प्लास्टिक ड्रम भरलेला गुळाचा सळवा, १०० लिटर मोहफुलाची दारू, भट्टीसाठी लागणारे साहित्य यामध्ये आठ स्टिलचे हंडे, गुंड आदी साहित्य आढळून आले. या मालाची एकूण किमत ५० हजार रूपये एवढी होते. सदर कारवाई पोलीस निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक विजय कोळेकर, पोलीस उपनिरिक्षक बगाटे, पोलीस हवालदार पवार, आडे, मनोज कुनघाडकर, भाऊराव टपाले, संजय बोल्लेवार, दुर्गे, कोरे, महिला पोलीस शिपाई महेश आत्राम, रोशना काळे यांनी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)