शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांनी होत आहे अपुरा पाणीपुरवठा

By admin | Updated: May 22, 2017 01:33 IST

सर्वात जास्त विहिरींचा गाव म्हणून वैरागडची ओळख आहे. या ऐतिहासीक गावात १०१ विहिरीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : सर्वात जास्त विहिरींचा गाव म्हणून वैरागडची ओळख आहे. या ऐतिहासीक गावात १०१ विहिरीत आहेत. कलाकुसरीने नटलेल्या आठ विहिरीत आहेत. वैलोचना व खोब्रागडी नदीच्या संगमावर गोरजाई डोह आहे. येथे मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध असतानाही वैरागड गावात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी संकट निर्माण झाले आहे. चार दिवसाच्या अंतराने नळ पाणी पुरवठा योजनेद्वारे गावात अल्प पाणी पुरवठा होत आहे. वैरागड येथे ३० वर्षापूर्वीची जुनी पाणी पुरवठा योजना आहे. गावाची वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेऊन तीन वर्षांपूर्वी पेयजल विभागाने येथे नवीन वाढीव पाणी पुरवठा मंजूर केली. त्याचा कृती आराखडाही तयार झाला. कार्यारंभ आदेश काही दिवसात निघून नव्या पाणी योजनेचे काम सुरू होणार, अशी परिस्थिती असताना येथील विद्यमान ग्रा.पं. सदस्याने वैरागड ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या पाठणवाडा येथील पाणी पुरवठा योजनेचा नवा प्रस्ताव या योजनेला जोडण्यात आला. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंत्याला हा प्रस्ताव नव्याने बदलवावा लागला. परिणामी २०१७ च्या उन्हाळ्यात सुरू होणारी नळ योजना रखडली. पाठणवाडा येथे ४० ते ४५ घरांची लोकवस्ती असून पाण्यासाठी या गावात हातपंप, सौरऊर्जेवरील नळ योजना, विहीर असताना या गावासाठी वैरागडची पाणी पुरवठा योजना थांबविण्याची चूक येथील स्थानिक प्रशासनाने केली. सध्या वैरागड गावात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असून चार दिवसाच्या अंतराने नळाद्वारे अल्प पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे ग्रा.पं. पदाधिकाऱ्याविरोधात नागरिकांचा नाराजीचा सूर आहे. गळतीच्या पाण्यावर येथील नागरिक तहाण भागवत आहे. नदीपात्रातील ‘तो’ खड्डा निरूपयोगी ४पाणी टंचाईवर तात्पुरती मात करण्यासाठी वैलोचना नदी पात्रात ५० हजारापेक्षा अधिक निधी खर्च करून पोकलँड मशीनच्या सहाय्याने खड्डा तयार करण्यात आला. मात्र या खड्ड्याचा पाणी पुरवठा सुविधेसाठी कोणताही उपयोग झाला नाही. ४आठ दिवसापूर्वी लोकमतने ‘नदी पात्रातील खड्डा ठरणार फार्स’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. लोकमतचे सदर वृत्त खरे ठरले आहे.