शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मुरूमगावातील दारू तस्कराला चार दिवसांचा पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:08 IST

आरोपी बहेरवार याच्यावर गडचिरोली ठाण्यात २, मुरूमगाव ठाण्यात २ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडलेल्या दारूसंदर्भात १ असे पाच गुन्हे दाखल आहेत. याशिवाय छत्तीसगड राज्यातील पेंढरी पोलीस ठाण्यातही दारूची आयात प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे कळते.

ठळक मुद्देदीड महिन्यानंतर शरण : सहकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे दीड महिन्यांपूर्वी शेतात मोठ्या प्रमाणात दारूसाठा गोळा करून ठेवणाऱ्या आणि दारूमुक्त गाव समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन चालविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी व्यंकटेश बहेरवार याला अखेर अटक झाली. त्याला ४ दिवसांचा पीआरही मिळाला. पण या प्रकरणात त्याला साथ देणारे इतर आरोपी अद्यापही मोकाट असून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.आरोपी बहेरवार याच्यावर गडचिरोली ठाण्यात २, मुरूमगाव ठाण्यात २ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडलेल्या दारूसंदर्भात १ असे पाच गुन्हे दाखल आहेत. याशिवाय छत्तीसगड राज्यातील पेंढरी पोलीस ठाण्यातही दारूची आयात प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे कळते. असे असताना गेल्या दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून तो पोलिसांना हुलकावण्या देत होता. अखेर दोन दिवसांपूर्वी तो स्वत:च पोलिसांना शरण गेला. मात्र गेल्या दिड महिन्यात आपल्यावरील दारू आणि जीवे मारण्याचा प्रयत्न या गुन्ह्यांमधून बाहेर पडण्यासाठी योग्य ती व्यवस्था त्याने लावून ठेवल्याची चर्चा आहे.छत्तीसगडमधील हलकी दारू आणणे आणि ती विशिष्ट ठिकाणी साठवून त्यातून इतर नामांकिन कंपन्यांची बनावट दारू बनविणे हा गोरखधंदा धानोरा तालुक्यातूनच सुरू असतो. विशेष म्हणजे या कामात बहेरवार याचे काही विश्वासू सहकारी आणि एक जवळचा नातेवाईक आहे. मुरूमगाव येथील महिलांनी दारू पकडली त्यावेळी हे लोकही तिथे होते. पण अद्याप त्यांचे नाव या प्रकरणात गोवण्यात आलेले नाही हे विशेष. बहेरवार याच्या अनुपस्थितीत हेच लोक त्याचा संपूर्ण कारभार पाहतात. त्यामुळे कारभार सुरळीत चालू ठेवण्यासाठी त्यांना बाहेर ठेवण्याची पुरेपूर व्यवस्था केली जात आहे.पोलीस ठोस भूमिका घेणार का?यासंदर्भात हे प्रकरण हाताळत असलेले मुरूमगावचे पोलीस निरीक्षक राजू थोरात यांना विचारणा केली असता आरोपी बहेरवार याच्या त्या सहकारी आणि नातेवाईकांबद्दलची माहीती असली तरी बहेरवार त्यांची नावे घेणार नसेल तर ते या प्रकरणात गुंतले आहेत असे म्हणता येणार नसल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे धानोराचे एसडीपीओ विक्रांत गायकवाड यांना विचारले असता ‘त्या’ आरोपींची पोलिसांना कल्पना असून आरोपीने त्यांना मोकळे ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, असा विश्वास व्यक्त केला. या प्रकरणावर माझे पूर्ण लक्ष असून कोणालाही वाचविण्याचा प्रयत्न होणार नाही, असे ते म्हणाले.‘त्या’ वाहनांचे मालकही मोकळेचमुरूमगावच्या प्रकरणात ज्यांच्या वाहनातून दारूची आयात होत होती त्या वाहनांच्या मालकांवरही अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. ती वाहने आरोपी बहेरवार याने भाड्याने घेतली होती, त्यामुळे वाहन मालकांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत त्यांना अभय दिले जात आहे. त्यामुळे एकूणच या प्रकरणाच्या खोलाशी न जाता सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी