शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार हजार कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार मिळाला

By admin | Updated: February 7, 2017 00:43 IST

२०१६-१७ या आर्थिक वर्षात जानेवारी महिन्यापर्यंत जिल्हाभरातील सुमारे ४ हजार ५८२ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे.

रोहयो काम : धानाचा हंगाम संपल्याने मागणी वाढलीगडचिरोली : २०१६-१७ या आर्थिक वर्षात जानेवारी महिन्यापर्यंत जिल्हाभरातील सुमारे ४ हजार ५८२ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वपूर्ण व महत्त्वकांक्षी योजना आहे. ज्या कालावधीत ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध राहत नाही. अशा कालावधीत नागरिकांच्या मागणीनुसार रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली जातात. नागरिकांची मागणी होताच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी काही कामे आधीच मंजूर करून त्यांना तांत्रिक मान्यताही प्रधान केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात विशेष करून जून ते नोव्हेंबर या कालावधीत धान पिकाच्या हंगामात रोजगार उपलब्ध होतो. त्यानंतर मात्र रोजगारासाठी भटकंतीच करावी लागते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात रोहयोचे विशेष महत्त्व आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्याचे बंधन आहे. रोजगार उपलब्ध न झाल्यास बेरोजगारी भत्ता द्यावा लागतो. धानाचा हंगाम संपताच रोहयो कामांची मागणी सुरू होते. गडचिरोली जिल्ह्यात एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ या कालावधीत सुमारे ४ हजार ५८२ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात गडचिरोली जिल्हा पिछाडीवर असल्याचे दिसून येते. अनेक जिल्ह्यांनी पाच हजारांपेक्षा अधिक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.दुर्गम भागातील अनेक नागरिकांना रोजगार हमी योजनेच्या कामाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कामाची मागणी पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. ग्रामसेवकही स्वत:हून काम देण्यास तयार होत नाही. या सर्व गोंधळात रोहयोसाठी निधी उपलब्ध असूनही कामे सुरू केली जात नाही. जिल्ह्याच्या रोहयोचा बजेट जवळपास ५०० कोटी रूपयांचा आहे. मात्र यातील अर्धे अधिक पैसे दरवर्षी परत जातात. (नगर प्रतिनिधी)बेरोजगारी भत्त्याबाबत मजूर अनभिज्ञरोहयो कामाची मागणी करूनही रोजगार उपलब्ध न झाल्यास संबंधित मजुराला बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद रोजगार हमी कायद्यात करण्यात आली आहे. मात्र या नियमाबाबत बहुतांश मजूर अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. कामाची मागणी करूनही बहुतांश ग्रामपंचायती व विभाग रोजगार उपलब्ध करून देत नाही. त्याचबरोबर नियमानुसार बेरोजगारी भत्ताही देत नाही. मात्र याबाबतची वरिष्ठस्तरावर तक्रार मजुरांकडून केली जात नाही. बेरोजगारी भत्ता मिळण्याबाबतची व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे.