शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपींना एकदा माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST

गेल्या १ मे रोजी कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या जांभुळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडविला होता. त्यात १५ पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. या प्रकरणात नक्षलवाद्यांना सहकार्य केल्याप्रकरणी लवारी गावातील ६ युवकांना पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून ते युवक न्यायालयीन कोठडीत आहेत.

ठळक मुद्देलवारीवासीयांची गळ : जांभुळखेडा भूसुरूंग प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चार महिन्यांपूर्वीच्या जांभुळखेडा भूसुरूंग स्फोट प्रकरणात अटकेत असलेल्या लवारी गावातील ६ आरोपींनी नक्षलवाद्यांना साथ देणे ही त्यांची चूक होती. भूलथापांना बळी पडून गावातील हे लोक त्यांच्या आहारी गेले. पण यापुढे आम्ही गावात नक्षलवाद्यांना पायही ठेवू देणार नाही. मात्र एकदा गावातील त्या युवकांना माफ करा, अशी विनंती लवारीतील ४९ गावकऱ्यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे निवेदनातून केली.गेल्या १ मे रोजी कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या जांभुळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडविला होता. त्यात १५ पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. या प्रकरणात नक्षलवाद्यांना सहकार्य केल्याप्रकरणी लवारी गावातील ६ युवकांना पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून ते युवक न्यायालयीन कोठडीत आहेत.अटकेत असलेल्या युवकांमुळे त्यांच्या कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे. एका युवकाचे शिक्षण अर्धवट राहिले आहे, अशी अनेक कारणे सांगत लवारीतील गावकरी आणि आरोपींच्या कुटुंबियांनी त्यांना एकदा माफी देण्याची गळ घातली. यावेळी त्यांनी नक्षलवाद्यांमुळे लवारी गावातील आदिवासी समाजातील तरुण पिढी बर्बाद होत असल्याचे आणि ते लोक स्वत:च्या फायद्यासाठी आमच्या मुलांचा वापर करत असल्याचे पोलीस अधीक्षकांना सांगितले. मात्र यापुढे असे होऊ देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला.यावेळी पोलीस अधीक्षकांनीही त्यांना नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी पडणाऱ्यांचे किती हाल होतात हे गावकऱ्यांना समजावून सांगितले.कायदेशिर मार्गाने शक्य ती मदत करणारआमची लढाई गावकऱ्यांशी नाहीच, पण त्यांनी नक्षलवाद्यांना साथ देऊन आपले जीवन व्यर्थ न घालवता विधायक आणि विकासात्मक काम करणाऱ्यांना साथ द्यावी ही आमची अपेक्षा आहे. त्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. त्यामुळे त्या गंभीर गुन्ह्यासाठी त्यांना कायदेशिर बाबींना तोंड द्यावेच लागेल. पण गावकरी जर आता बोलत असल्याप्रमाणे आपल्या वागणुकीत बदल करून नक्षलवाद्यांना संपूर्ण गावबंदी करणार असतील, पोलिसांना त्यांच्या कामात सहकार्य करणार असतील तर आम्हीही त्यांना कायदेशिर मार्गाने शक्य तेवढी मदत करू, असे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.ग्रामसभेत घेणार नक्षल गावबंदीचा ठरावनक्षलवाद्यांमुळे गावावर आलेले संकट यापुढे येऊ नये म्हणून गावकरी स्वयंस्फूर्तीने पुढे आले आहेत. लवकरच ग्रामसभा घेऊन नक्षलवाद्यांना आमच्या गावात आम्ही पाय ठेवू देणार नाही. तसेच ‘नक्षल गावबंदीचा’ ठराव ग्रामसभेत घेणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना दिली. गावाच्या विकासासाठी पोलीस दलाने जनजागरण मेळाव्याचे आयोजन करावे, असे पत्र पुराडा पोलीस स्टेशनला दिले असल्याचेही गावकºयांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी