शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वादळानंतर डोक्यावर मरण घेऊन राहताहेत वन कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:55 IST

आलापल्ली येथे झालेल्या वादळामुळे वन विभागाच्या अनेक निवासस्थानांवरील छप्पर व टिन उडून गेले. मात्र या घटनेला सहा दिवसांचा कालावधी उलटूनही वन विभागाने निवासस्थाने दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली नाही. निवासस्थानांवर ताडपत्री झाकून आश्रय घेतला आहे.

ठळक मुद्देआलापल्ली येथील स्थिती : निवासस्थानांना ताडपत्र्यांचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : आलापल्ली येथे झालेल्या वादळामुळे वन विभागाच्या अनेक निवासस्थानांवरील छप्पर व टिन उडून गेले. मात्र या घटनेला सहा दिवसांचा कालावधी उलटूनही वन विभागाने निवासस्थाने दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली नाही. निवासस्थानांवर ताडपत्री झाकून आश्रय घेतला आहे.आलापल्लीसह परिसराला १६ मे रोजी वादळाचा जोरदार तडाखा बसला होता. या वादळामुळे अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. या वादळाचा सर्वाधिक फटका वन विभागाच्या वसाहतीला बसला. वन विभागाच्या वसाहतीतील बहुतांश घरे टिनाची आहेत. १६ मे रोजी झालेल्या वादळात जवळपास २० निवासस्थानांवरील छतासह टिन उडून गेले. त्यामुळे घर पूर्णपणे उघडे पडले. दुसऱ्याच दिवशी मुख्य वनसंरक्षक येटबॉन, आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक सी. आर. तांबे, उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल, सहायक उपवनसंरक्षक एच. जी. मडावी, आलापल्लीचे वन परिक्षेत्राधिकारी किरण पाटील यांनी वसाहतीला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. मुख्य वनसंरक्षकांनी निवासस्थाने तत्काळ दुरूस्त करण्याचे निर्देश दिले. मात्र आता सहा दिवसांचा कालावधी उलटूनही घरांच्या दुरूस्तीला सुरूवात झाली नाही. ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी काही वन कर्मचाºयांनी तात्पुरती ताडपत्री झाकली आहे. मात्र दिवसा प्रचंड उन्हाचा त्रास वनकर्मचाºयांच्या कुटुंबियांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यामुळे वादळी वाºयासह पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस झाल्यास झोपण्याचा व राहण्याचा प्रश्न कुटुंबासमोर निर्माण झाला आहे. त्याचबरोबर घरातील संपूर्ण साहित्य भिजण्याची शक्यता आहे.दिवसभराच्या उन्हामुळे वनकर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची प्रकृती बिघडत आहे. त्यांना उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वादळ झाल्यास सदर ताडपत्री कधीही उडून जाऊ शकते. पाऊस झाल्यास मोठे नुकसान होणार असल्याने वन कर्मचाºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य वनसंरक्षकांनी या गंभीर बाबीकडे स्वत: लक्ष घालून निवासस्थानांची दुरूस्ती करून द्यावी, अशी मागणी होत आहे.