शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

वनपरिक्षेत्राला रिक्त पदांचे ग्रहण

By admin | Updated: May 28, 2015 00:58 IST

तालुक्यातील ८७ गावांचा समावेश असलेल्या चामोर्शी वनपरिक्षेत्रातील पाच वनरक्षकांची पदे मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.

वनरक्षकांची पाच पदे रिक्त : वनसंरक्षण करताना होत आहे अडचणचामोर्शी : तालुक्यातील ८७ गावांचा समावेश असलेल्या चामोर्शी वनपरिक्षेत्रातील पाच वनरक्षकांची पदे मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे जंगलाचे संरक्षण करताना कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे.घोट वनपरिक्षेत्राचे विभाजन करून चामोर्शी वनपरिक्षेत्र कार्यालयाची स्थापना सन २००९ साली करण्यात आली. या वनपरिक्षेत्र कार्यालयात एकूण ५२ पदे मंजूर आहेत. यामध्ये वनपरिक्षेत्राधिकाऱ्याचे एक पद, वनपाल सहा पदे, वनमजूर आठ पदे, कार्यालयीन कर्मचारी दोन पदे, स्वच्छकाचे एक पद मंजूर आहे. ही सर्व पदे भरण्यात आली आहेत. मात्र वनरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या वनरक्षकाची ३४ पैकी २९ पदे भरण्यात आली आहेत. तर पाच पदे रिक्त आहेत. त्यामुळे जंगलाचे संरक्षण करताना कार्यरत कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर पदे भरण्याबाबत वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र अजूनपर्यंत सदर पदे भरण्यात आले नाहीत. रिक्त पदांसोबत या वनपरिक्षेत्र कार्यालयातही अनेक समस्याही कार्यरत आहेत. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना निवासस्थान नाही, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात कार्यालय थाटण्यात आले आहे. या कार्यालयांतर्गत २२ वनसंरक्षण समित्या असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र सभागृह आहे. वनाच्या संरक्षणाबरोबरच परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी अगरबत्ती, विटाभट्टी प्रकल्प, वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने चालविले जातात. सुमारे १७ हेक्टरवर वनोद्यान तयार करण्यात आले आहे. याचेही नियोजन वनकर्मचाऱ्यांना करावे लागते. (शहर प्रतिनिधी)