शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:25 IST

अंशकालीन पेंशन योजना लागू असलेल्या कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला शासनाकडून मदत व इतर शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना पाठपुरावा करेल, असा निर्णय बुधवारी पार पडलेल्या सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देएकस्तर वेतन श्रेणी लागू करा : जुनी पेंशन हक्क संघटनेच्या सभेत निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अंशकालीन पेंशन योजना लागू असलेल्या कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला शासनाकडून मदत व इतर शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना पाठपुरावा करेल, असा निर्णय बुधवारी पार पडलेल्या सभेत घेण्यात आला.महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीची जिल्हास्तरीय सहविचार सभा बुधवारी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथील विश्रामगृहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अंकूश मैलारे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिला संघटिका वनश्री जाधव, जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे, जिल्हा सरचिटणीस बापू मुनघाटे, जिल्हा कोषाध्यक्ष विजय मुडपल्लीवार, मीडिया प्रमुख विठ्ठल होंडे आदी उपस्थित होते.सभेला जिल्हाभरातील संघटनेच्या शेकडो पदाधिकारी व सदस्यांनी हजेरी लावली. सभेदरम्यान अहवालवाचन संघटनेचे सरचिटणीस बापू मुनघाटे यांनी केले. मागील सभेचे इतिवृत्त वाचून ते कायम करण्यात आले. एसबीआयने कर्मचाऱ्यांसाठी स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज हे खाते सुरू केले आहे. यातून कर्मचाºयांना सर्वाेत्कृष्ट सुविधा मिळत असल्याने याच बँकेतून पगार करावे, यासाठी पाठपुरावा करण्याबाबत संघटनेचे उपाध्यक्ष अंकूश मैलारे यांनी मार्गदर्शन केले.सातवा वेतन आयोग एकस्तर वेतनश्रेणीशिवाय लागू केल्यास मिळणारे वेतन हे जुन्या वेतनापेक्षाही कमी मिळते. त्यामुळे प्रत्येकाने चटोपाध्याय श्रेणी लागू करता येईल, यासाठी पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचे मत विठ्ठल होंडे यांनी व्यक्त केले. डीसीपीएस व एनपीएसधारक कर्मचाºयांसाठी स्वतंत्र सहकारी पतसंस्था स्थापनेविषयी जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे यांनी विचार मांडले.संचालन गणेश आखाडे तर आभार अमित टेंभुर्णे यांनी मानले. सभेला कैलास कोरेटी, गणेश आखाडे, धनराज मोगरकर, तुळशीदास नरोटे, दीपक सुरपाम, प्रशांत ठेंगरे, कालिदास वट्टी, सुजीत दास, दीपक पुंगाटी, रामेश्वर गभणे, मुलचंद शिवणकर, नीकेश बन्सोड, सदाशिव कुमरे, प्रवीण धाडसे, अमित टेंभुर्णे, सुरेश चव्हाण, वृषाली कुंभारे, रत्नमाला सयाम, गणेश चौधरी, के. बी. हेमके, उमेश जेंगठे, छत्रपती शंकरवार, एम. एस. लांजेवार, जी. ए. राठोड, दुर्गादास कापकर, किसन सोनुले, एस. आर. दोहतरे, गुंफेश बिसेन, सचिन मेश्राम, जी. बी. वाघाडे, घोडमारे, आर. डी. कोवासे, सी. आर. वट्टी, टी. आर. नंदगिरवार आदी उपस्थित होते.कपातीचा हिशेब मागणारपेंशनसाठी कर्मचाºयांच्या वेतनातून काही रक्कम कपात केली जाते. मात्र कर्मचाºयाच्या पगारातून कपात झालेली रक्कम, त्यावरील व्याज, हिशेबाच्या पावत्या यांचा ताळमेळ जुळत नसल्याने कर्मचारी चिंतेत आहेत. त्यांचे लाखो रूपये बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सर्व हिशेब मागण्यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्ताचा तुटवडा आहे. सामाजिक दृष्टीकोन लक्षात घेऊन लवकरच रक्तदान शिबिर आयोजित केले जाईल, असाही निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोग