शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

लोकबिरादरीत विद्यार्थ्यांनी साकारली शैक्षणिक गंमत जत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

गंमत जत्रेचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व समाजसेविका डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवाने, लोकबिरादरी हॉस्पिटलचे संचालक डॉ.दिगंत आमटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनघा आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समीक्षा आमटे, प्राचार्य डॉ.विलास तळवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ठळक मुद्देसातवे वर्ष : पाणी विषयावर विविध उपक्रम सादर

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी आश्रमशाळेच्या स्नेहसंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी २५ डिसेंबर रोजी बुधवारला विद्यार्थ्यांनी पाणी या विषयावर उत्कृष्ट शैक्षणिक गंमत जत्रा साकारली.या गंमत जत्रेचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व समाजसेविका डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवाने, लोकबिरादरी हॉस्पिटलचे संचालक डॉ.दिगंत आमटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनघा आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समीक्षा आमटे, प्राचार्य डॉ.विलास तळवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. व्यवस्थापिका समीक्षा आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गंमत जत्रेचे हे सलग सातवे वर्ष आहे. आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पाणी विषयावर विविध उपक्रम सादर केले. सायंकाळी ६ पर्यंत ही गंमतजत्रा प्रदर्शनी सुरू होती.यशस्वीतेसाठी बंडू कुडयेमी, भक्ती बानोत, तुषार कापगते, विजया पद्मावार, सुरेश गट्टेवार, विनोद समर्थ, शरिफ शेख, जमीर शेख, श्रीराम झोडे, ज्योती तडवेकर, प्रा.खुशाल पवार, प्रा.गिरीश कुलकर्णी आदींनी सहकार्य केले. अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनी पाहण्यासाठी गर्दी केली.महापूर व जलप्रदूषणावर जागृतीपर दिला संदेशइयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी पाण्याच्या वापराचे चित्र प्रदर्शन, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी जलचक्र, तिसºया विद्यार्थ्यांनी पाणी शुद्धीकरण व बचतीच्या सोप्या पद्धती, इयत्ता चवथीतील विद्यार्थ्यांनी जलप्रदूषण, पाचवीतील विद्यार्थ्यांनी पर्जन्यमापक यंत्र व पावसाचे मोजमाप, सहावीच्या विद्यार्थ्यांनी पॉली हाऊस शेती व पाण्याचा वापर, सातवीच्या विद्यार्थ्यांनी २०१९ वर्षातील भामरागडचा महापूर व महाराष्ट्राचा महाप्रलकारी महापूर, आठवीच्या विद्यार्थ्यांनी भूमिगत पाण्याचा साठा, वापर व प्रदूषणाचा धोका, नववीच्या विद्यार्थ्यांनी पाणी दुष्काळ, कारणे आणि परिणाम व इतर विद्यार्थ्यांनी बाटलीबंद पाणीपुरी स्टॉल आदी उपक्रमातून पाण्याविषयी अनमोल संदेश दिला. नेलगुंडा येथील साधना विद्यालय, जिंजगाव येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी या जत्रेत सहभाग नोंदविला.