शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पूर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:19 IST

सोमवारी व मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लहान मोठ्या नदी व नाल्यांना पूर आला होता.

गुरूवारी पावसाने घेतली उसंत : अनेक मार्ग मोकळे; महसूल प्रशासनातर्फे नुकसानीचे पंचनामे सुरूलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सोमवारी व मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लहान मोठ्या नदी व नाल्यांना पूर आला होता. पुराचे पाणी गावात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र बुधवारी दुपारनंतर पावसाने उसंत घेतली. गुरूवारीही अपवाद वगळता पाऊस झाला नाही. त्यामुळे गुरूवारी जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र या मूसळधार पावसाने २९२ घरांची पडझड झाली असल्याचे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेत दिसून आले आहे. पावसाअभावी धान रोवणीची कामे खोळंबली होती. संपूर्ण जिल्ह्यात दोन दिवस दमदार पाऊस झाल्याने एकाच वेळी रोवणीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरूवात केली. जुलै महिना लागला तरी मामा तलाव कोरडेच होते. दोन दिवसाच्या पावसामुळे मात्र तलावांमध्ये जलसाठा निर्माण झाला आहे. वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदी पूल मागील आठ दिवसात दोनवेळा बुडला होता. पावसाने उसंत घेतल्याने या मार्गावरची वाहतूक बुधवारी पूर्ववत सुरू झाली. धानोरा तालुक्यातील रांगी-निमगाव दरम्यानच्या नाल्यावरील पुलावर पाण साचले होते. त्यामुळे रांगी-गडचिरोली दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. सदर मार्ग पूर्ववत सुरू झाला. सिरोंचा महामार्गावरील मोसम व नंदीगावदरम्यान झिमेला नाल्याच्या पुलाजवळ झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. गावातील नागरिकांनी झाड बाजुला केले. एटापल्ली तालुका मुख्यालयापासून एक किमी अंतरावर असलेल्या डुम्मी नाल्याला पूर आल्याने या ठिकाणचीही वाहतूक ठप्प पडली होती. गुरूवारी डुम्मी नाल्यावरचाही पूर ओसरला.पूरग्रस्त भामरागड झाले चिखलमय, घरात-दुकानातही चिखलअतिवृष्टीचा सर्वाधिक फटका भामरागड शहराला बसला. भामरागड शहर अगदी पर्लकोटा नदीच्या काठावर वसले आहे. पर्लकोटा नदीचे पाणी बुधवारच्या रात्री भामरागड शहरात शिरले. त्यामुळे येथील दुकानदार, नागरिकांना इमारतीमधून कोणतेच सामान काढता आले नाही. पुराचे पाणी शिरताच नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी सुरक्षित जागेचा शोध घेतला. यामुळे मनुष्यहानी झाली नसली तरी प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाली आहे. पुराचे पाणी जवळपास २४ तास दुकानांमध्ये शिरून होते. दुकानदारांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २४ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. पूर ओसरला मात्र गावात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. घरातही चिखल पसरला आहे. शेतीची कामे सोडून आता घराची डागडुजी व साफसफाई करण्याचे काम भामरागडवासीयांना करावे लागत आहे.