शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे शंभरावर गावे संपर्काबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:21 IST

पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी रविवारी दुपारी वाढली. पुराचे पाणी भामरागड शहरात शिरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भामरागडसह जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देपर्लकोटा, बांडीया नदी पुलावर पाणी : इंद्रावती, पामुलगौतम या नद्यांच्या जलस्तरात झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/भामरागड : पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी रविवारी दुपारी वाढली. पुराचे पाणी भामरागड शहरात शिरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भामरागडसह जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती या नद्या छत्तीसड राज्यातून वाहतात. शनिवारी छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तिन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली. पर्लकोटा ही नदी भामरागड शहराच्या अगदी जवळून वाहते. तिन्ही नद्यांचे भामरागडजवळ संगम सुध्दा आहे. तिन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने पर्लकोटा नदी पर्लकोटा नदीला दाब निर्माण झाली. त्यामुळे पर्लकोटा नदीचे पाणी शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पूलावर चढले. अचानक पाणी वाढल्याने नागरिकांमध्ये खळबळ माजली. सामान इतरत्र हलविण्याची धडपड रात्रभर सुरू होती. १२ वाजता भामरागड चौकातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाणाऱ्या मार्गावर कंबरभर पाणी जमा झाले होते. मात्र पहाटे ४ वाजताच्या सुमारास नदीचे पाणी कमी होण्यास सुरूवात होऊन सकाळी ७ वाजता पूल मोकळा झाला. त्यानंतर पुन्हा रविवारी सकाळी १० वाजता पाणी वाढण्यास सुरूवात झाली. दुपारी १२ वाजतानंतर भामरागडातील चौकात पाणी जमा होऊ लागले. सायंकाळपर्यंत पूर्ण चौक पुराच्या पाण्याने व्यापला होता. सायंकाळी उशीरापर्यंत पाण्याची पातळी वाढतच होती. त्यामुळे भामरागड शहरातील नागरिकांमध्ये खळबळ माजली होती. पर्लकोटा नदी पुलावर पाणी चढल्याने भामरागड तालुक्यातील ८० गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. भामरागड-आरेवाडा नाल्यावर पाणी असल्याने या परिसरातील १० गावांचा भामरागड तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. तर भामरागड-कोठी, हेमलकसा-आलापल्ली मार्गावरील बांडीया नाल्यावरील पुलावर पाणी जमा झाले होते. पूर परिस्थिती असताना पूल ओलांडू नये, तसेच कोणीही सेल्फी काढू नये, यासाठी एसडीपीओ तानाजी बरडे, ठाणेदार सुरेश मदने यांच्या नियंत्रणात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच तहसीलदार कैलास अंडील यांनी सुध्दा परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते.जिमलगट्टा : जिमलगट्टा नाला भरून वाहत असल्याने देचलीपेठा परिसरातील जवळपास १० गावांचा संपर्क तुटला आहे. पेरमिली : आलापल्ली-भामरागड मार्गावरील पेरमिलीजवळच्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत होते. यामुळे धान शेतीचेही पुराचे पाणी शेतीत शिरल्याने धान पिकाचेही नुकसान झाले. झिंगानूर : झिंगानूरपासून आठ किमी अंतरावर असलेल्या कोपेला नाल्यावर पाच ते सहा फूट पाणी जमा झाले आहे. या नाल्यावर पूल नाही. पावसाळ्यात एक पाऊस झाल्यानंतर सदर मार्ग बंद होतो. आसरअल्ली, अंकिसा, सोमनपल्ली, सिरोंचा, सोमनूर, गुमालकोंडा, मुत्तापूर गावांकडे जाणारे मार्ग बंद झाले.सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील बामणी व टेकडाताला नाल्यावर पाणी असल्याने या भागाचाही संपर्क तुटला होता.