शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेडनेटद्वारे फुलविली शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 23:49 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत १०० टक्के अनुदानावर शेडनेट उभारून दुर्गम भागातील ताटीगुडम येथील एका आदिवासी शेतकºयाने आपल्या शेतजमिनीत....

ठळक मुद्देकृषी विभागाच्या मार्गदर्शनात पहिले शेडनेट : ताटीगुडमच्या शेतकºयाची उद्योगी शेतीकडे वाटचाल

विवेक बेझलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत १०० टक्के अनुदानावर शेडनेट उभारून दुर्गम भागातील ताटीगुडम येथील एका आदिवासी शेतकºयाने आपल्या शेतजमिनीत विविध प्रकारच्या भाजीपाला पिकाची लागवड करून आपली शेती फुलविली आहे. शेडनेटच्या माध्यमातून यंदाच्या खरीप हंगामात लाख रूपयांचे उत्पन्न मिळविणार असल्याचा विश्वास या प्रगतशील शेतकºयाने व्यक्त केला आहे.आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत गेल्या काही वर्षांपासून विशेष केंद्रीय सहाय्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेअंतर्गत आदिवासी शेतकºयांना १०० टक्के अनुदानावर भाजीपाला पिकांसाठी शेडनेट पुरविले जाते. या योजनेचा ताटीगुडम येथील शेतकरी मल्लेश पोचा सिडाम यांनी लाभ घेतला. खरीप हंगामाच्या सुरुवातीला सिडाम यांनी आपल्या एकूण हेक्टर क्षेत्रापैकी ५०० चौ.फूट क्षेत्रावर शेडनेट उभारले.सिडाम यांच्याकडे एकूण दोन एकर शेती आहे. सिडाम हे यापूर्वी सदर शेतीमध्ये केवळ धानपिकाचे उत्पादन घेत होते. मात्र आदिवासी विकास विभागाच्या योजनेतून कृषी विभागाच्या अधिकाºयांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या आधारावर सिडाम या शेतकºयाने अतिदुर्गम भागात हरितक्रांती केली, असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही. सिडाम यांनी शेडनेट उभारून मिरची, वांगे, टमाटर, दोडका, भोपळा व विविध प्रकारचे फूल, पालेभाज्या लावल्या आहे.सदर योजनेचा लाभ चंद्रा येथील शेतकरी मुसली बग्गा वेलादी याने सुद्धा घेतला आहे. शिवाय कोरेली बुजच्या वाले कोच्चा कुळमेथे, ताटीगुडम येथील रामभाई मलय्या आत्राम, गंगाराम विस्तारी मडावी यांनीही सदर योजनेच्या अनुदानातून आपल्या शेतात शेडनेट उभारून भाजीपाला पिकाच्या शेतीस वाव दिला आहे. कमी जागेत उत्तम व गुणवत्तापूर्ण उत्पन्न घेण्यासाठी या शेडनेटचा उपयोग शेतकºयांना होत आहे.आदिवासी विकास विभागाच्या अनुदानातून मिळणाºया शेडनेट या योजनेबाबत अहेरी तालुक्याच्या दुर्गम भागात कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांमध्ये जनजागृती करण्यात आली. अहेरी तालुक्यातील अनेक शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेतला असून ते आता विविध प्रकारचे पिके या शेडनेटच्या आधारे घेत आहेत. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी या शेतकºयांना मार्गदर्शन करतात.- सचिन पानसरे, तालुका कृषी अधिकारी, अहेरी