शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कार्यशाळेच्या छतातून गळते पाणी

By admin | Updated: July 13, 2016 02:12 IST

येथील कार्यशाळेच्या छतावर टिनाचे पत्रे टाकण्यात आले आहेत. मात्र या टिनाच्या पत्र्यांमधून पाणी गळत असल्याने कार्यशाळेत पावसाचे पाणी जमा झाले आहे.

एसटी विभागाचे दुर्लक्ष : बस दुरूस्तीचे काम करताना कर्मचाऱ्यांना अडचण गडचिरोली : येथील कार्यशाळेच्या छतावर टिनाचे पत्रे टाकण्यात आले आहेत. मात्र या टिनाच्या पत्र्यांमधून पाणी गळत असल्याने कार्यशाळेत पावसाचे पाणी जमा झाले आहे. हेच पाणी बाजुच्या कार्यालयामध्येही जात असल्याने कार्यालयामधील कर्मचारीसुद्धा त्रस्त झाले आहेत. गडचिरोली आगारात एकूण ९३ बसेस आहेत. या बसेसची देखभाल करण्याबरोबरच किरकोळ दुरूस्तीचे काम केले जाते. यासाठी बसस्थानकाच्या समोरील बाजूस स्वतंत्र शेड उभारण्यात आले आहे. या शेडमध्येच कार्यशाळेचे काम केले जाते. शेडच्यावर टिनपत्रे टाकण्यात आले आहेत. यातील काही टिनपत्रे जुने असल्याने त्यांच्यावर छिद्र पडले आहेत. तसेच आळ्याच्या मधील बाजुचे टीन सरकले असल्याने त्यांच्यामधून पावसाचे पाणी कार्यशाळेमध्ये गळते. मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी पाणी जमा झाले होते. याच ठिकाणी एसटी दुरूस्तीचे काम केले जाते. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना पावसाच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. पावसाचे पाणी खाली जमा झाल्याने काम करणे कठीण होत आहे. बरेचसे एसटीचे काम खाली झोपून करावे लागते. अशातच फरशीवर पाणी राहत असल्याने काम कसे करावे, असा प्रश्न एसटी कामगारांसमोर निर्माण झाला आहे. एसटी दुरूस्त करण्याचे साहित्यही या ठिकाणी राहते. सदर साहित्यसुद्धा पावसाच्या पाण्याने खराब होण्याची शक्यता आहे. याच इमारतीत एका खोलीमध्ये कार्यालय आहे व दुसऱ्या खोलीमध्ये आगार व्यवस्थापकांचे कक्ष आहे. कार्यालयामध्ये एसटीचे महत्त्वाचे दस्तावेज आहेत. या कार्यालयात जवळपास १० ते १५ कर्मचारी काम करतात. मात्र पावसाच्या पाण्यामुळे या कार्यालयातही ओलसरपणा राहते. कर्मचारीही त्रस्त आहेत. त्यामुळे आगार प्रशासनाने तत्काळ सदर शेड दुरूस्त करावा, अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)