शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजाराेहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST

पाेलीस मदत केंद्र नारगुंडा : प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजाराेहण करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी अधिकारी अश्विन गजभिये, पीएसआय सचिन सानप, सागर ...

पाेलीस मदत केंद्र नारगुंडा : प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजाराेहण करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी अधिकारी अश्विन गजभिये, पीएसआय सचिन सानप, सागर अन्नमवार, सीआरपीएफचे सहायक कमांडंट संताेषकुमार, एसआरपीएफचे पीएसआय सचिन ढाेरे तसेच नागरिक व नारगुंडा हलवेर येथील विद्यार्थी व शिक्षक हजर हाेते. यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी व देशभक्ती गीतांवर नृत्य सादर केले. बक्षीस व मिठाई वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

भामरागड : प्रजासत्ताक दिनानिमित्त धाेडराज, मुरंगल, परयनार येथे ध्वजाराेहण करण्यात आले. लाहेरी पाेलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर, सीआरपीएफचे कमांडंट संताेष भाेसले यांनी नक्षलविराेधी अभियान राबवित असताना मुरंगल येथे तर धाेडराज मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बाबासाहेब दुधाडे, सीआरपीएफचे पाेलीस निरीक्षक कृष्णन कुटी यांनी परयनार येथे दाखल हाेऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला.

जि. प. प्राथमिक शाळा, वडदेली : प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कमला आत्राम यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. वडदेली येथील अपघातग्रस्त कुटुंबातील येल्ला पेंटा आत्राम यांना शाळेतील शिक्षकांनी शिलाई मशीन भेट दिली. यावेळी नागरिक हजर हाेते.

विदर्भ प्रदेश हमाल मजदूर कार्यालय, गडचिराेली : प्रजासत्ताक दिनानिमित्त संत गाडगेबाबा हमाल सहकारी संस्थेचे अध्यक्ष जीवन साेनवाने यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी दिवाकर ताजणे, विलास भाेयर, किशाेर शेरकी, बंडू क्षिरसागर, िदलीप भाेयर, सिद्धार्थ पापडकर, सुरेश भाेयर व नागरिक उपस्थित हाेते.

स्वामी विवेकानंद ज्युनिअर काॅलेज गडचिराेली : प्रजासत्ताक दिनानिमित्त बेबी चिचघरे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी आबाजी चिचघरे, प्राचार्य संगीता चडगुलवार, प्रा. आशिष वानखेडे, तेजस्वी येल्लेवार, हिना खान उपस्थित हाेते. ध्वजाराेहणानंतर विद्यार्थ्यांनी मनाेगत व्यक्त केले. तसेच देशभक्तीवर गीतगायन व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. संचालन जान्हवी चिंतलवार तर आभार वैभव बाेबाटे यांनी मानले.

लालाजी पाटील खेवले विद्यालय, माैशिखांब : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्याध्यापक आर. आर. बनपूरकर यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. याप्रसंगी संविधान प्रास्ताविकेचे वाचन विद्यार्थ्यांनी केले. त्यानंतर तंबाखू व व्यसनमुक्तीची शपथ घेतली. यावेळी सुधाकर खेवले, जी. के. ठाकरे, जगदीश्वर ठाकरे, शिक्षक सुभाष ताेडासे, प्रशांत वाघरे, चैतू उसेंडी, सीमा धाडसे, जया मसराम, रूमाजी बारसागडे, देवाजी खेडकर उपस्थित हाेते.

शिवाजी महाविद्यालय, गडचिराेली : प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. बी. एस. चिकटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. जे.जी.उईके, प्रा.एस.पी. ढोमने तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक प्रमुख सुरज मोहुर्ले, उपप्रमुख चेतन कोलते, चंचल रोहणकर, निखिल गणवीर, अमोल पोरटे,अभय कुकडे उपस्थित होते.

जि. प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, एटापल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्राचार्य व्ही. एल. चव्हाण यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू कुरमावार, राजेश्वर वाघाडे व कर्मचारी उपस्थित हाेते. याप्रसंगी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

तहसील कार्यालय, आरमाेरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संवर्ग विकास अधिकारी चेतन हिवंज, पोलीस निरीक्षक दिगांबर सूर्यवंशी, नायब तहसीलदार राठोड, सहायक पाेलीस निरीक्षक पंकज बाेंडसे, पीएसआय भाग्यश्री शिंदे, कांचन उईके, दिलीप जवंजाळकर, मनोहर ज्ञानबोनवार उपस्थित हाेते.

एटापल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजाराेहण झाले. येथील तहसील कार्यालयात तहसीलदार अजयकुमार अष्टे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी उपविभागीय पाेलीस अधिकारी सूदर्शन पाटील उपस्थित हाेते. पोलीस पथकाने संचलन केले. यावेळी अधिकारी हजर हाेते. पंचायत समितीमध्ये सभापती शालीकराम गेडाम यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. यावेळी बीडीओ किशोर गज्जलवार, उपसभापती जनार्धन नल्लावार, जि. प. सदस्य संजय चरडुके उपस्थित होते. राजीव गांधी हायस्कूलमध्ये लोकमतचे पत्रकार रवी रामगुंडेवार यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. यावेळी मुख्याध्यापिका झेड. एस. शेख, श्रीकांत कोकुलवार व शिक्षक उपस्थित होते. भगवंतराव विद्यालयात शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य दत्तात्रय राजकोंडावार यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. यावेळी प्राचार्य डाॅ. एस.एन. बुटे, प्राचार्य एस. एस. पठाण उपस्थित होते. तोडसा ग्राम पंचायतमध्ये प्रशांत आत्राम यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले.