शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आविका संस्थांच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:08 IST

कुरखेडा व कोरचीसह जिल्ह्यातील सर्व आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलबिंत आहेत. या संदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करुन सुध्दा प्रश्न निकाली काढण्यात आले नाही.

ठळक मुद्देआमदारांना निवेदन : आविका पदाधिकारी, कर्मचारी जिल्हा संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कुरखेडा व कोरचीसह जिल्ह्यातील सर्व आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलबिंत आहेत. या संदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करुन सुध्दा प्रश्न निकाली काढण्यात आले नाही. सध्या आविकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी आविका पदाधिकारी, कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने आ. कृष्णा गजबे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.आविका पदाधिकारी, कर्मचारी जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या नेतृत्त्वात पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आ. कृष्णा गजबे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.निवेदनात, आदिवासी संस्थेचे २०१५-१६ या वर्षातील २० टक्के कमिशन संस्थेला द्यावे, २०१७-१८ या वर्षातील २ टक्केपेक्षा कमी घटतूट असलेल्या संस्थेचे ५० टक्के कमिशन त्वरित द्यावे, संस्थेचे २००९-१० ते २०१७-१८ पर्यंतचे प्रति क्विंटल १ प्रमाणे साठवणूक भाडे देण्यात यावे, संस्थेच्या खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाची उचल महामंडळाने ८ ते १० महिन्यानंतर केल्यामुळे उघड्यावरील धानाची अवाजवी तूट येते. त्यामुळे संस्थाना आर्थिक नुकसान होते. धान साठवणुकीच्या कालावधीत आधारित तूट मंजूर करावी, २ टक्के घट ही ग्राह्य धरु नये, आदिवासी संस्थेचे २००९-१० ते २०१४-१५ या कालावधीचे अवाजवी तुटीपोटी राखुन ठेवलेले खरेदी कमिशन संस्थेला द्यावे, तसेच आदिवासी संस्थेचे धान खरेदीचे कमिशन प्रति क्विंटल ७० रुपये करण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश होता.निवेदन देताना कृऊबासचे संचालक तथा आविका उपाध्यक्ष विनोद खुणे, देलनवाडीचे उपसभापती रत्नाकर धाईत, पदाधिकारी-कर्मचारी संघटनेचे सचिव माधव तलमले सहसचिव भाऊराव घोडमारे, कोषाध्यक्ष हेमंत शेंदरे, संचालक महादेव मेश्राम, देलनवाडी सोसायटीचे अध्यक्ष बी. आर. पदा व आविका संस्था संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.अधिवेशनात मांडणार समस्याआविका संस्थांच्या बळकटीसाठी त्वरीत प्रयत्न करावे अशी मागणी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये व पदाधिकारी यांनी केली असता, आ. कृष्णा गजबे यांनी आविकाचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर असून या अधिवेशनात सदर समस्यांचा पाठपुरावा करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना