शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:26 IST

गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, या प्रमुख मागणीसह ओबीसी समाजाच्या विविध समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी भारतीय जनता पार्टी आरमोरी तालुका ओबीसी सेलच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

ठळक मुद्देभाजप पदाधिकाऱ्यांची मागणी : मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिष्टमंडळामार्फत निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, या प्रमुख मागणीसह ओबीसी समाजाच्या विविध समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी भारतीय जनता पार्टी आरमोरी तालुका ओबीसी सेलच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओबीसी प्रवर्गाला नॉन क्रिमिलेअरच्या अटीतून सुट द्यावी, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करून जातीनिहाय आकडेवारी घोषित करावी, ओबीसीसाठी मंजूर केलेला स्वतंत्र मंत्रालय, लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतूद करून तत्काळ कार्यान्वित करावे, शेतकरी हिताच्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू करावे. मंडल आयोगाच्या मूळ शिफारशी तत्काळ लागू कराव्या, पदभरती संवर्गातील अधिसूचना रद्द करून राज्यात असलेल्या आरक्षणानुसार सर्वाना समान संधी द्यावी, जिल्ह्यातील ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, शेतमालाला हमी भाव जाहीर करताना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के मुनाफा जोडून जाहीर करण्यात यावा. पारंपरिक पीक आणेवारीत बदल करून क्षेत्रनिहाय आणेवारी काढून नुकसानीच्या प्रमाणात आर्थिक मदत द्यावी, सिंचनासाठी साखळी बंधाºयाची निर्मिती करून शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करावी. शेतमालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र केंद्र उभारून शेतमालाचा दर ठरविण्याचा अधिकार शेतकºयांना द्यावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह जिल्हा व तालुकास्तरावर सुरू करावे, इतर प्रवर्गाप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती लागू करावी. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करावे, ओबीसी कर्मचाऱ्यांना सेवेत इतरांप्रमाणे पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, जिल्हास्तरावर ओबीसीसाठी स्वतंत्र उपाययोजना सुरू करून या योजनेच्या नियोजनात ओबीसींचा सहभाग ठेवावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. शासन स्तरावर ओबीसींच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. या मागण्यांसंदर्भात अनेकदा पाठपुरावा करण्यात आला परंतु दुर्लक्ष झाले, असेही पदाधिकाºयांनी म्हटले.मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना खा. अशोक नेते, आ. कृष्णा गजबे, डॉ. देवराव होळी, मोतिलाल कुकरेजा, भाजप ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष नंदू नाकतोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.