शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार बालके आढळली कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:05 IST

आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत जिल्हाभरात ४ हजार ८८० बालके कुपोषित आढळून आली आहेत. त्यामध्ये ९५८ बालके अतिकुपोषित तर ३ हजार ९२२ बालके मध्यम कुपोषित आढळून आले आहेत.

ठळक मुद्देआरोग्य विभागाची पाहणी : ९५८ बालके अतिकुपोषित; आरोग्य विभागाच्या उपाययोजनानंतरही समस्या गंभीर

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत जिल्हाभरात ४ हजार ८८० बालके कुपोषित आढळून आली आहेत. त्यामध्ये ९५८ बालके अतिकुपोषित तर ३ हजार ९२२ बालके मध्यम कुपोषित आढळून आले आहेत.गडचिरोली जिल्ह्यात शून्य ते पाच या वयोगटात सुमारे ७९ हजार ९५० बालके आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार प्रत्येक बालकाची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते. बालकांचे कुपोषण ही गंभीर समस्या असल्याने कुपोषण दूर करण्यासाठी आरोग्य व बाल कल्याण विभागाच्या मार्फत विविध उपाययोजना योजल्या जातात. मात्र अजूनही पूर्णपणे कुपोषणमुक्तीतून सुटका मिळाली नाही. आरोग्य व बालकल्याण विभागाच्या मार्फत महिला गरोदर असल्यापासून पोषणाबाबत योग्य मार्गदर्शन केले जाते. त्यांना पोषण आहार उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर वेळोवेळी औषधेही उपलब्ध करून दिली जातात. मात्र दुर्गम भागातील काही महिला व बालकांना या सर्व सोयीसुविधांचा लाभ मिळत नाही. त्याचबरोबर त्या निरक्षर असल्याने स्वत:ची व बालकाच्या आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेत नाही, परिणामी अजूनही जिल्ह्यात कुपोषणाची समस्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अतिशय गंभीर आहे. एकूण बालकांच्या सुमारे ६.१९ बालके अजूनही कुपोषणाच्या विळख्यात सापडले आहेत. मात्र आरोग्य विभागाच्या योजनांमुळे कुपोषणाची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे.तालुकानिहाय कुपोषित बालकांची संख्याअहेरी तालुक्यात २७१ बालके मध्यम कुपोषित, ८४ बालके अतिकुपोषित, आरमोरी तालुक्यात २०४ मध्यम कुपोषित, २९ अतिकुपोषित, भामरागड तालुक्यात ३८८ मध्यम कुपोषित, ९५ अतिकुपोषित, चामोर्शी तालुक्यात ४८५ बालके मध्यम कुपोषित, १०१ अतिकुपोषित, देसाईगंज तालुक्यात ४३८ मध्यम कुपोषित, ७९ अतिकुपोषित, धानोरात ४०२ मध्यम कुपोषित, १०४ अतिकुपोषित, एटापल्लीत ४७७ मध्यम कुपोषित, १६१ अतिकुपोषित, गडचिरोलीत ४१९ मध्यम कुपोषित, ६८ अतिकुपोषित, कोरचीत २८८, कुरखेडात २६३, मुलचेरा २२०, सिरोंचा २९४ बालके कुपोषित आढळले आहेत.