शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

पाच दुकाने जळून खाक

By admin | Updated: April 28, 2015 02:07 IST

येथील तळेगाव मार्गावर असलेल्या आठवडी बाजार परिसरात असलेल्या दुकानांना रविवारी रात्री १०.३० ते ११

कुरखेड्यातील बाजारपेठेला आग : पाच लाखांचे नुकसानकुरखेडा : येथील तळेगाव मार्गावर असलेल्या आठवडी बाजार परिसरात असलेल्या दुकानांना रविवारी रात्री १०.३० ते ११ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने पाच दुकाने जळून खाक झाली. यामुळे दुकानदारांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.रविवारी सायंकाळच्या सुमारास कुरखेड्यात वादळ आले होते. त्यानंतर रात्री १०.३० वाजताच्या सुमारास अचानक दुकानांना आग लागली. वादळामुळे आग पसरल्याने लगतची दुकानेही अग्निलोळात सापडली. यामुळे पाच दुकाने संपूर्णत: जळाली, तर एका दुकानाचे अंशत: नुकसान झाले. खुशाल नंदेश्वर यांच्या टेलिरिंग दुकानमधील शिवणयंत्रे व शिवलेले कापड भस्मसात झाले. यामुळे त्यांचे ९७ हजारांचे नुकसान झाले. सोमनाथ पोरेटी यांचेही टेलरिंग दुकान आगीच्या कचाट्यात सापडल्याने शिवणयंत्रे व कापड असे सुमारे एक लाख १६ हजार रुपयांच्या साहित्याची राखरांगोळी झाली. सदाशिव कुमरे यांच्या संगीत वाद्याच्या दुकानालाही आगीने वेढल्याने त्यांचे एक लाख ६५ हजारांचे नुकसान झाले. वसंत राऊत यांच्या टेलरिंग दुकानमधील शिवणयंत्रे व कापड जळाले. त्यामुळे त्यांची ९७ हजारांची हानी झाली. श्रावण बैसाकू यांच्या सायकल स्टोअर्समधील १५ सायकली व सुटे भाग आगीमुळे जळाले. परिणामी त्यांना ९२ हजारांचे नुकसान सहन करावे लागले. या दुकानांच्या आगीची झळ शेजारच्या प्रकाश दहीकर यांच्या चहाटपरीला पोहचली. त्यांचे सात हजारांचे नुकसान झाले. सोमवारी सकाळी कुरखेडाचे तलाठी सोनकुसरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. (तालुका प्रतिनिधी)आमदारांनी भेट देऊन केली पाहणीकुरखेडातील बाजारपेठेला आग लागून दुकाने जळून खाक झाल्याची घटना माहित होताच आमदार क्रिष्णा गजबे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच आपदग्रस्त दुकानदारांची आस्थेने विचारपूस केली. शासनाकडून दुकानदारांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी गणपत सोनकुसरे, चांगदेव फाये, बंडू लांजेवार, हरिश्चंद्र डोंगरवार उपस्थित होते.