शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन वेगवेगळ्या अपघातांत पाच गंभीर जखमी

By admin | Updated: July 7, 2016 01:23 IST

बुधवारी जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील नान्ही, चामोर्शी तालुक्यातील घोट व अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे बुध्वारी झालेल्या तीन अपघातात एकूण ५ इसम गंभीर जखमी झाले.

कुरखेडा/घोट/आलापल्ली : बुधवारी जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील नान्ही, चामोर्शी तालुक्यातील घोट व अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे बुध्वारी झालेल्या तीन अपघातात एकूण ५ इसम गंभीर जखमी झाले. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर व नागपूरला हलविण्यात आल्याची माहिती आहे.भरधाव महेंद्रा पीकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना कुरखेडापासून तीन किमी अंतरावर नान्ही येथे बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. खामतळा येथील चरणदास जेंगठे हे गावातीलच दाजीराम मडावी व त्यांची मुलगी दिपाली मडावी तिला केशोरी येथील जिल्हा परिषद शाळेत स्वत:च्या एमएच-३३-पी-७८०० क्रमांकाच्या दुचाकीने नेऊन देत होते. दरम्यान नान्ही येथे समोरून येणाऱ्या एमएच-३३-जी-१४६६ क्रमांकाच्या बोलेरो महेंद्र पिकअप दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार दाजीराम मडावी (४६) हे गंभीर जखमी झाले. तसेच चरणदास जेंगठे (४०) हे सुद्धा जखमी झाले.दुचाकीन वाहनाने जात असताना विरूद्ध दिशेने येणाऱ्या पीकअप वाहनाने नान्ही फाट्याजवळ दुचाकीला जबर धडक दिली. यात जेंगठे यांच्या डोक्याला प्रचंड दुखापत झाल्याने ते घटनास्थळीच बेशुद्ध झाले. मडावी यांच्या छाती व हाताला दुखापत झाली. या दोन्ही जखमींना लागलीच कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी या दोघांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. या घटनेची नोंद कुरखेडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कुरखेडा पोलीस करीत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून कुरखेडा तालुक्यात अपघात होत आहेत. यापूर्वी अनेकांचा बळीही गेला आहे. (तालुका प्रतिनिधी)आलापल्ली मार्गावरही अपघात; एक गंभीरआलापल्ली मार्गावरील हसन बाग हॉटेलसमोर बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक युवक गंभीर जखमी झाला. विनोद पेंदाम (२४) रा. वांगेपल्ली असे जखमी युवकाचे नाव आहे. लागलीच पोलीस विभागाच्या वाहनाने जखमी पेंदाम याला अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर चंद्रपूरला रेफर केले. जखमी झालेला विनोद पेंदाम हा युवक जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुतन्ना पेंदाम यांचा पुतण्या होय.