शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाच नगर पंचायतींमधील ‘त्या’ आरक्षित जागा झाल्या सर्वसाधारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या ५ नगरपंचायतींचा समावेश आहे. तेथील सदस्यपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम २०२१-२२ जाहीर करण्यात आला आहे. नगरपंचायतीमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्यामधील महिलाऐवजी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणातील बदलास अंतिम मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेतून वगळलेल्या पाच नगर पंचायतींमधील नामाप्रसाठी राखीव जागांवरील आरक्षण आता हटविण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच त्या जागांसाठी नव्याने नामांकन भरण्याची प्रक्रिया सुरू हाेणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबर २०२१ च्या आदेशानुसार आरक्षित असलेल्या नामाप्रच्या जागा अनारक्षित करण्यात आल्या. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या ५ नगरपंचायतींचा समावेश आहे. तेथील सदस्यपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम २०२१-२२ जाहीर करण्यात आला आहे. नगरपंचायतीमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्यामधील महिलाऐवजी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणातील बदलास अंतिम मान्यता प्रदान करण्यात आली आहे. हा बदल तसेच प्रभागनिहाय आरक्षणाबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी माहिती जाहीर केली. विभागीय आयुक्तांच्या २७ डिसेंबर २०२१ च्या आदेशान्वये गडचिरोली जिल्ह्यातील ५ नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या प्रभागनिहाय आरक्षणाची माहिती जाहीर करण्यात आली.

अहेरी नगर पंचायतआरक्षण बदलानंतर नगर पंचायत अहेरी  येथे अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभाग १७ तर अनुसूचित जाती (महिला) साठी प्रभाग १३, अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक २ आणि ७ तसेच महिलांकरिता प्रभाग -४, ९ व १६ राहणार आहे. याशिवाय सर्वसाधारण प्रवर्गासाठी आता प्रभाग १, ३, ५, ८, आणि १४ तर सर्वसाधारण (महिला) करिता प्रभाग ६, १०, ११, १२ आणि १५ राहणार आहे.

सिरोंचा नगर पंचायत नगरपंचायत सिरोंचा  येथे अनुसूचित जातीसाठी प्रभाग ४ व याच प्रवर्गात महिलांसाठी प्रभाग ८ व १७, अनुसूचित जमातीसाठी प्रभाग २ तर महिलांसाठी प्रभाग ७, सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक १, ५, ६, १०, ११ आणि १४, तर सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग ३, ९, १२, १३, १५ आणि १६ राहणार आहे. 

चामोर्शी नगर पंचायतचामोर्शी  येथे अनुसूचित जातीसाठी  प्रभाग ४ तर महिलांसाठी प्रभाग ६, अनुसूचित जमाती महिलांसाठी प्रभाग १३, सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग २, ७, ९, १०, ११, १२ आणि १६ तर सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग १, ३, ५, ८, १४, १५ आणि १७ राखीव राहणार आहेत. यामुळे ओबीसी प्रवर्गातील इच्छुकांचा हिरमाेड झाला आहे.

धानोरा नगर पंचायतधानोरा येथे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक 17, तर अजा महिलांसाठी प्रभाग १, अनुसूचित जमातीसाठी प्रभाग ६, १० तर महिलांसाठी प्रभाग ४, १२ आणि १४ राहणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग ५, ९, ११ १५ आणि १६, तर सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग २, ३, ७, ८ आणि १३ राहतील.

कुरखेडा नगर पंचायतनगरपंचायत कुरखेडा येथे अनुसूचित जातीसाठी प्रभाग १४ व अजा महिलांसाठी प्रभाग ४, १३, अनुसूचित जमातीसाठी प्रभाग ९, अज महिलांसाठी प्रभाग ११ व १६, तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग २, ३, ६, १२, १५ आणि १७, तर सर्वसाधारण महिलांसाठी १, ५, ७, ८ आणि १० हे प्रभाग आरक्षित राहणार आहेत.

 

टॅग्स :Electionनिवडणूक