शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पाच खोदतळ्यांची निर्मिती

By admin | Updated: February 6, 2017 01:31 IST

चामोर्शी तालुक्यातील हळदवाही व हळदवाही टोला गावातील ७५ टक्के शेतकऱ्यांना कन्नमवार जलाशयाचे पाणी मिळते.

 हळदवाहीत वन विभागाचा पुढाकार : कोरडवाहू शेतीसाठी पाण्याची सोय भाडभिडी : चामोर्शी तालुक्यातील हळदवाही व हळदवाही टोला गावातील ७५ टक्के शेतकऱ्यांना कन्नमवार जलाशयाचे पाणी मिळते. परंतु उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, या हेतूने वन विभागाच्या वतीने पुढाकार घेऊन परिसरात पाच खोदतळ्यांची निर्मिती जानेवारी महिन्यात करण्यात आली. पावसाचे पाणी कितीही पडले तरी ते अडविण्याची सोय नसल्याने पाणी वाहून जाते. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे. जलसंवर्धन करणे गरजेचे असतानाच वन विभागाने पुढाकार घेऊन चामोर्शी वन परिक्षेत्रातील हळदवाही नाल्यालगतच्या संरक्षित वनात पाच खोदतळ्यांची निर्मिती जानेवारी महिन्यात करण्यात आली. या खोदतळ्यांमुळे भूजलपातळी वाढून शेतकऱ्यांनाही पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. हळदवाही व हळदवाही टोला गावालगतच्या संरक्षित वनात खंड क्र. ८६२ व ८६३ मध्ये ३० बाय ३० मीटर लांब व रूंद तसेच १० फुट खोल असे पाच खोदतळे निर्माण करण्यात आले. सदर काम पूर्ण झाले आहे. गावातील ७५ टक्के शेतकऱ्यांना कन्नमवार जलाशयाचे पाणी उपलब्ध होत होते. परंतु २५ टक्के शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. परंतु आता पाच खोदतळ्यांची निर्मिती करण्यात आल्याने पाण्याची पातळी वाढून शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोयही उपलब्ध झाली आहे. सोबतच या खोदतळ्यांमध्ये मत्स्यव्यवसायही करता येणार आहे. त्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण असून वन विभागाच्या पुढाकाराने निर्माण करण्यात आलेल्या खोदतळ्याच्या कामाचे हळदवाही, हळदवाही टोला येथील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. (वार्ताहर)