शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

गडचिरोली येथे धान पिकात केली मत्स्य शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 14:37 IST

देसाईगंज तालुक्यातील नैनपूर येथील भाग्यश्री सेंद्रिय शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांनी धान शेतीमध्येच मत्स्य शेतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे.

ठळक मुद्देआत्माचे मार्गदर्शननैनपूर येथे नाविन्यपूर्ण प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : निसर्गाचा लहरीपणा, रोगांचा प्रादुर्भाव, धानाला असलेला अल्प बाजारभाव यामुळे आजच्या घटकेला धानाची शेती परवडणारी नाही, अशी शेतकऱ्यांची ओरड असतांनाच देसाईगंज तालुक्यातील नैनपूर येथील भाग्यश्री सेंद्रिय शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांनी धान शेतीमध्येच मत्स्य शेतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे.यावर्षी एकरी चार लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. त्यामुळे शेती परवडणारी नाही असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांसमोर या शेतकऱ्यांनी नवा आदर्श उभा केला आहे. यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली यांचे मार्गदर्शन लाभत आहे.नैनपूर येथे आत्मा अंतर्गत भाग्यश्री सेंद्रिय शेतकरी गट तयार करण्यात आला. या गटाने स्वत:साठी नियमावली तयार करुन सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. या गटाचे अध्यक्ष गजेंद्र महादेव ठाकरे तर सचिव शंकर चेंडूजी भाजीपाले आहेत. याच गटातील अन्नाजी तुपट व गजेंद्र ठाकरे यांनी यावर्षी आपल्या प्रत्येकी अर्धा एकरमध्ये सेंद्रिय धान शेतीत मत्स्य शेती करण्यास सुरूवात केली आहे. त्यांचा हा प्रयोग नाविन्यपूर्ण असून यासाठी आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनात तालुका तंत्रव्यवस्थापक महेंद्र दोनाडकर व कृषी सहाय्यक कल्पना ठाकरे यांचे सहकार्य लाभत आहे. यासाठी शेतकऱ्यांना आत्माकडून ५० हजारांचे अनुदान प्राप्त झाले आहे.शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चौकोनी आकारात चारही बाजूला दीड मीटर खोल व तीन मीटर रुंद खड्डा तयार केला आहे.त्यात रोहु, कथला, शिप्रस जातीच्या माशांचे बिज सोडले आहे. उर्वरित जागेत श्रीपध्दतीने मकरंद जातीच्या धान पिकाची रोवणी केली आहे. धान पिकासाठी पूर्णत: सेंद्रिय खताचा वापर करीत आहेत. माशांना खाद्य म्हणून गोमूत्र, शेण, गुळ, वडाच्या झाडाखालील माती, बेसन, ताक यापासून तयार केलेल्या जिवांमृताचा वापर केला जात आहे. माशांच्या विष्ठेचा धान पिकासाठी उपयोग होत असल्याने धानाच्या वाढीस पोषक ठरत आहे. शेतात सोडलेले मासे ७ ते ८ महिन्यात एक किलो वजनाचे होऊन विक्री योग्य होतात. अर्धा एकर शेतीतून शेतकºयांना बाजार भावानुसार दोन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. धान पीक पूर्णत: सेंद्रिय व सुवासिक असल्याने त्यापासून २० हजार रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे.उत्पादन खर्च कमी व उत्पन्न जास्त यामुळे धान शेतीतून मत्स्य शेती हा प्रयोग शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर ठरणारा आहे. सोबतच पुढे शेतावर माशांसाठी खड्डा करुन उपसा केलेल्या मातीपासून तयार झालेल्या पाळीवर शेवगा व आंब्यांच्या झाडांची लागवड करुन उत्पन्न वाढविण्याचा शेतकऱ्यांचा मानस आहे. सदर शेतकऱ्यांचा हा प्रयोग पाहण्याठी इतर जिल्ह्यातील शेतकरी येथे येत आहेत. आजपर्यंत भंडारा जिल्ह्यातील १२५ व गोंदिया जिल्ह्यातील १२० शेतकऱ्यांनी भेट देऊन या प्रयोगाची माहिती जाणून घेतली आहे.शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरणे काळाची गरज असून शेतीत पूरक उद्योग केल्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार नाही. अशा प्रकारच्या मिश्र शेतीमुळे उत्पादन दुपटीने वाढण्यास मदत होईल. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढविण्याचे आत्माचे उद्दिष्ट आहे.- महेंद्र दोनाडकर, तालुका तंत्रव्यवस्थापक देसाईगंज

सेंद्रिय शेती कमी खर्चाची असून शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर न करता धानपिका सोबत मत्स्य शेती सारखे नाविन्यपूर्ण प्रयोग केल्यास शेतकऱ्यांना शेती फायदेशीर ठरेल.- उमेशचंद्र तुपट, शेतकरी,भाग्यश्री सेंद्रिय शेती गट नैनपूर

टॅग्स :agricultureशेती