शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पेसा कायद्यामुळे सिरोंचाचे मच्छीमार संकटात

By admin | Updated: August 28, 2014 23:48 IST

गडचिरोली जिल्ह्यात राज्यपालांच्या अधिसुचनेनंतर पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पेसा कायद्यांतर्गत तलाव मच्छीमार सहकारी सोसायटीकडून काढून ग्रामसभेकडे देण्यात आले आहे.

सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यात राज्यपालांच्या अधिसुचनेनंतर पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पेसा कायद्यांतर्गत तलाव मच्छीमार सहकारी सोसायटीकडून काढून ग्रामसभेकडे देण्यात आले आहे. या निर्णयामुळे सिरोंचा तालुक्यातील ५ हजार मासेमारीचा व्यवसाय करणारे कुटुंब आर्थिक अडचणीत आले आहे. त्यांनी बँकेकडून घेतलेले कर्ज परत फेड करणेही त्यांना अशक्य झाले आहे. सिरोंचा हा महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगत असलेला दुर्गम तालुका आहे. या तालुक्यात जुने मामा मालगुजारी तलाव मोठ्या प्रमाणावर आहे. निजामकालीन बांधकाम झालेले हे तलाव सध्या अनेक गावात असल्याने या तलावात मासेमारीचा व्यवसाय चालतो. गावातील मच्छीमार सहकारी संस्थाच्यामाध्यमातून मासेमारीचा व्यवसाय चालत होता. यासाठी डोंगे व इतर साहित्यही खरेदी करण्यात आले होते. परंतु गडचिरोली जिल्ह्यात जून महिन्यापासून पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली व गावातील मासेमारी सहकारी संस्थेकडे असलेले हे तलाव ग्रामपंचायतींकडे पर्यायाने ग्रामसभेकडे सूपुर्द करण्याचे आदेश झालेत. त्यामुळे मच्छीमार अडचणीत आले आहे. ग्रामसभा या संस्थेंतर्गत असलेल्या मच्छीमारांना तलाव ठेक्याने द्यायला तयार नाहीत. सिरोंचा तालुक्यात काही सहकारी संस्थांनी मत्स्य बीज व अन्य सामुग्री खरेदीसाठी सोसायटी व बँकांकडून कर्ज घेतले आहे. आता मासेमारीचा व्यवसाय बंद झाल्याने या कर्जाची परतफेड करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. राज्य सरकारने मत्स्य सेवा सहकारी संस्थांची कर्जमाफी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच पेसा कायद्यातून तलाव वितरणाच्या निकषाला वगळण्यात यावे, अशी मागणीही होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात या समस्येबाबत मच्छीमार बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता. मात्र राज्य सरकारकडून या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मच्छीमार कमालीचे अडचणीत आले आहे. (तालुका प्रतिनिधी)