शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लहान वयापासूनच आर्थिक शिक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:57 IST

मुलांना बचतीची सवय व बँकेचे व्यवहार या वयापासून समजू लागले आहे, हे उल्लेखनीय काम आहे. नुसती पैशाची बचत नाही तर पाणी, वीज, अन्न त्याचप्रमाणे विद्यार्थी जीवनापासून छोटे व्यवसाय करण्याची सवय मुलांना लागली, हे महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : शाळकरी मुलांसोबत साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुलांना बचतीची सवय व बँकेचे व्यवहार या वयापासून समजू लागले आहे, हे उल्लेखनीय काम आहे. नुसती पैशाची बचत नाही तर पाणी, वीज, अन्न त्याचप्रमाणे विद्यार्थी जीवनापासून छोटे व्यवसाय करण्याची सवय मुलांना लागली, हे महत्त्वाचे आहे. यापुढेही विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच आर्थिक शिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.शुक्रवार २२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात परिसंवादाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळकरी मुलांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी सिंह बोलत होते. याप्रसंगी मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, मेलजोलच्या कार्यकर्त्या संगीता मानसे, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे प्रमुख डॉ.सतीश गोगुलवार आदी मान्यवर उपस्थित होते. आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा, मेलजोल मुंबई व आयसीआयसी बँकच्या वतीने अफलातीन प्रकल्पाच्या माध्यमातून कोरची, कुरखेडा, आरमोरी, धानोरा व मुलचेरा तालुक्यातील ८५ व खासगी शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक व आर्थिक उद्योजकतेच्या उपक्रमाचे धडे देण्यात आले. मुलांना बचत ही संकल्पना शिकविण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या परिसंवादात सहभागी झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांनी प्रकल्पाच्या माध्यमातून वर्षभरातील त्यांच्या शाळेत केलेल्या उल्लेखनीय कामांची मांडणी केली. आम्ही काय शिकलो, यावर जास्त भर देण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन प्रकल्प समन्वयक महेश लाडे यांनी केले तर आभार पूनम वासनिक यांनी मानले. यशस्वीतेसाठी अफलातील टीमच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी