शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेचं कंत्राट ठरलं एसटीसाठी पांढरा हत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 22:27 IST

आवश्यकतेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक

- दिगांबर जवादेगडचिरोली : बसस्थानक आणि एसटी बसगाड्यांची स्वच्छता करण्यासाठी महामंडळाने ऑक्टोबर २०१७ मध्ये एका खासगी कंपनीला कंत्राट दिले. यामध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे स्वच्छतेवरील खर्च वाढला. हा खर्च एसटी महामंडळाच्या आवाक्याबाहेर झाल्याने एसटीने कंपनीला पैसे देणे बंद केले आहे. परिणामी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थकीत असल्याने राज्यातील बहुतांश बस स्थानकांमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे बसस्थानकांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.बसस्थानक, आगाराची स्वच्छता करणे, बसगाड्या धुणे या कामांसाठी पूर्वी एसटी महामंडळाने स्वच्छता कर्मचाºयांची नेमणूक केली होती. हे कर्मचारी मोजकेच होते. पण एसटीच्या केंद्रीय कार्यालयाने २०१७ मध्ये स्वच्छतेचे कंत्राट काढले. २ ऑक्टोबर २०१७ पासून स्वच्छतेचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले. राज्यभरातील बसस्थानकांच्या स्वच्छतेचे कंत्राट एकाच कंपनीला मिळाले आहे. विशेष म्हणजे स्वच्छता कंत्राटात अधिक कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे स्वच्छतेचा कंत्राटही महागला.मागील वर्षभरापासून एसटीची आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. डिझेल व कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही एसटीकडे पुरेसे पैसे नाहीत. उधारी घेऊन काम भागविले जात आहे. अशा स्थितीत बऱ्याचशा आगारांनी कंपनीला पैसे दिले नाहीत. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून स्वच्छता कर्मचाऱ्यांना कंपनीने वेतन दिले नाही.यावर तोडगा काढण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी २६ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आगार, बसस्थानक व एसटीच्या इतर कार्यालयांमध्ये कचºयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.काही आगारांमध्ये जुन्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून एसटी गाड्यांची साफसफाई करून काम भागविले जात आहे. सदर कंपनीचे कंत्राट ऑक्टोबर २०२० पर्यंत आहे. मात्र एसटीचे  केंद्रीय कार्यालय यावर कोणता तोडगा काढते याकडे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

६ कर्मचाऱ्यांच्या कामासाठी जुंपले ३० कर्मचारीगडचिरोली बसस्थानकात पूर्वी सहा स्वच्छता कर्मचारी होते. नवीन कंत्राटानुसार ३० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. कर्मचारी वाढल्याने एसटीचा खर्चसुद्धा वाढला. ऑगस्ट २०१९ पर्यंत एसटीच्या केंद्रीय कार्यालयामार्फत संबंधित कंपनीला पैसे दिले जात होते. त्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जात होते. मात्र ऑगस्टनंतर केंद्रीय कार्यालयाने कंपनीला पैसे देण्याची जबाबदारी स्थानिक बसस्थानकावर सोपविली.