शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कोरोनाबाधित क्षेत्रात फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

२७ मे रोजीच्या रात्री शहरातील दोन संशयीत रूग्णांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेत खळबळ माजली. रूग्ण राहत असलेल्या येथील आंबेडकर वॉर्डाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. सदर प्रतिबंधित क्षेत्रात इतर लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जंतनाशक फवारणी करून हा परिसर निर्जंतूक केल्या जातो.

ठळक मुद्देकोरोनाबाबत खबरदारी : तीन दिवसानंतर प्रतिबंधित आंबेडकर वॉर्डात पोहोचली चमू

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : धानोरा शहरातील दोन रूग्णांचे नमुना कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरात दहशत निर्माण झाली आहे. याबाबीला तीन दिवसांचा कालावधी उलटूनही स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने रूग्ण निवासी असलेल्या आंबेडकर वॉर्डात २०० मीटरच्या आत जंतनाशक फवारणी करण्यात आली नव्हती. दरम्यान ही बाब लोकमतच्या प्रतिनिधीने लक्षात आणून दिल्यानंतर नगर पंचायतीच्या वतीने कोरोनाबाधित क्षेत्रात सायंकाळी उशिरा जंतनाशक फवारणी करण्यात आली.२७ मे रोजीच्या रात्री शहरातील दोन संशयीत रूग्णांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेत खळबळ माजली. रूग्ण राहत असलेल्या येथील आंबेडकर वॉर्डाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. सदर प्रतिबंधित क्षेत्रात इतर लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जंतनाशक फवारणी करून हा परिसर निर्जंतूक केल्या जातो. ही जबाबदारी स्थानिक नगर पंचायत प्रशासनाकडे तहसीलदारांच्या आदेशान्वये सोपविण्यात आली. शहरातील दोन रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने रूग्णांचे घर व घराला लागून असलेल्या दुकानांत जंतनाशक फवाणी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी येथील नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या घरापर्यंत फवारणी करण्यात आली. वेळ झाल्याचे कारण सांगून फवारणीची चमू परतली. दुसºया दिवशी आंबेडकर वॉर्डात फवारणी करण्यात येईल, असे चमूच्या वतीने सांगण्यात आले. मात्र तीन दिवस उलटूनही फवारणी करणारी कामगारांची चमू आंबेडकर वॉर्डात फिरकली नव्हती. दरम्यान लोकमतच्या प्रतिनिधीसह सुज्ञ नागरिकांनी नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर मुख्याधिकाºयांनी ४.३० वाजतानंतर फवारणीसाठी चमू पाठविली.पाच लाखांचा निधी प्राप्त मात्र उपाययोजना तोकड्याचधानोरा शहरात व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याची खबरदारी महसूल व नगर पंचायत प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी धानोरा नगर पंचायत प्रशासनाला पाच लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने अद्यापही सॅनिटायझर तसेच मास्कचे वितरण सर्वसामान्य नागरिकांना करण्यात आले नाही.धानोरा शहराच्या आंबेडकर वॉर्डात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर संबंधित रूग्णाचे घर व लगतच्या दुकानात जंतनाशक फवारणी करण्यात आली मात्र उर्वरित आंबेडकर वॉर्डात २०० मीटरच्या आतील भागात जंतनाशक फवारणी करण्यात आली नव्हती. कोरोना संसर्गाच्याबाबत गडचिरोली जिल्हा १५ दिवसांपूर्वी ग्रीन झोनमध्ये होता. मात्र त्यानंतर रूग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने हा जिल्हा आॅरेंज झोनमध्ये गेला. कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नगर पंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे. रविवारी सायंकाळी उशिरा आंबेडकर वॉर्डात फवारणी करण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या