शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म सिंचन व्यवस्थेवर भर देणार

By admin | Updated: November 24, 2014 22:56 IST

गडचिरोली जिल्ह्यातील ८९ टक्के जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे सुक्ष्म सिंचन, माजी मालगुजारी तलाव, शिरपूर व कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे, पंपाचे ऊर्जितीकरण व सौरउर्जेवरील

आढावा बैठक : मुख्यमंत्र्यांची घोषणागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ८९ टक्के जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे सुक्ष्म सिंचन, माजी मालगुजारी तलाव, शिरपूर व कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे, पंपाचे ऊर्जितीकरण व सौरउर्जेवरील पाच हॉर्सपॉवरचे पंप शेती सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, मुख्यमंत्र्यांचे प्रधानसचिव प्रविण परदेशी, खासदार अशोक नेते, आमदार मितेश भांगडिया, देवराव होळी, अम्ब्रीशराव महाराज, क्रिष्णा गजबे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी रणजितकुमार, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक रविंद्र कदम, गडचिरोली जिल्ह्याचे मुख्यवनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यात एकूण जंगल क्षेत्रापैकी एक चतुर्थांश जंगल गडचिरोली जिल्ह्यात आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास मोठी मदत झाली आहे. या जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी राज्य सरकारचा विकासाचा फोकस हा गडचिरोलीवर केंद्रीत राहिल. जनता व प्रशासन यांच्या समन्वय साधला जाऊन चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन निश्चितपणे उभे राहिल. एवढेच नव्हे तर अधिकाऱ्यांसोबत संबंधीतांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासनाला दर्जेदार कामाची अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. जिल्ह्यात वनविभागामार्फत सध्या अगरबत्ती प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी व्हियतनामवरून काड्या आयात कराव्या लागत आहे. त्याची निर्मिती गडचिरोली जिल्ह्यातच कशी करता येईल, यादृष्टीने वनविभागाने प्रयत्न ठेवावे व या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात रिक्त पदांचा आढावा घेऊन पदभरती संदर्भात शासन लवकरच निर्णय घेईल, असेही मुुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्र सरकार अतिदुर्गम मागास, विकासापासून दूर असलेल्या समाज घटकांना विकासाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी सर्वांनी दक्षपणे काम करावे, असेही ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)