शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्यासाठी संघर्ष करा

By admin | Updated: June 12, 2014 00:06 IST

विदर्भ राज्य झाल्याशिवाय विकासाची कल्पना करणे अशक्य आहे. त्यामुळे विदर्भ राज्य निर्मितीसाठी संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राम नेवले यांनी केले.

एल्गार : राम नेवले यांचे प्रतिपादनगडचिरोली : विदर्भ राज्य झाल्याशिवाय विकासाची कल्पना करणे अशक्य आहे. त्यामुळे विदर्भ राज्य निर्मितीसाठी संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राम नेवले यांनी केले.स्थानिक शिवाजी महाविद्यालयात विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्यावतीने सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी नामदेवराव गडपल्लीवार तर प्रमुख अतिथी म्हणून समितीचे मुख्य निमंत्रक दीपक निलावार, अरूण केदार, अरूण मुनघाटे, अ‍ॅड. संजय ठाकरे, डॉ. रमेश गजबे, रमेश भुरसे, पांडूरंग भांडेकर, समय्या पसूला, प्राचार्य खुशाल वाघरे, राजेंद्रसिंग ठाकूर, रोहिदास राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करतांना नेवले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्याची मागणी पूर्ण होऊ शकते, त्यासाठी संघटनात्मक बांधणी करून तीव्र आंदोलन छेडण्याची गरज आहे. विदर्भवासियांनी संघटीत होऊन वेगळ्या विदर्भाची मागणी केली पाहिजे. विदर्भ राज्य झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणे शक्य नाही. विदर्भातील साधनसंपत्ती लुटून पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यामध्ये संघटनात्मक बांधणी करायची असून जिल्ह्यातील दोघा जणांचा कोर कमिटीमध्ये समावेश राहणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागपूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन निमंत्रक अरूण मुनघाटे यांनी केले. आभार रमेश भुरसे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विदर्भ राज्य आंदोलन शाखा गडचिरोलीच्या सदस्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)