शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावणेतीन लाख नागरिक अद्याप लसीकरणापासून दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 05:00 IST

आराेग्य विभागाकडे असलेल्या नाेंदीनुसार गडचिराेली जिल्ह्याची लाेकसंख्या ११ लाख ९१ हजार ८०१ एवढी आहे. सध्या १८ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जात आहे. गडचिराेली जिल्ह्यात १८ वर्षांपुढील ८ लाख ३७ हजार १०५ एवढी लाेकसंख्या आहे. काेराेनापासून मुक्तीचा लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाेईल, यासाठी प्रशासन व आराेग्य विभाग प्रयत्न करीत आहे. जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असले तरी लसीकरणासाठी पात्र असलेल्या एकूण लाेकसंख्येपैकी सुमारे २ लाख ८० हजार नागरिक अजूनही पहिल्या डाेसपासून दूरच असल्याचे दिसून येत आहे. आराेग्य विभागाकडे असलेल्या नाेंदीनुसार गडचिराेली जिल्ह्याची लाेकसंख्या ११ लाख ९१ हजार ८०१ एवढी आहे. सध्या १८ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जात आहे. गडचिराेली जिल्ह्यात १८ वर्षांपुढील ८ लाख ३७ हजार १०५ एवढी लाेकसंख्या आहे. काेराेनापासून मुक्तीचा लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाेईल, यासाठी प्रशासन व आराेग्य विभाग प्रयत्न करीत आहे. जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली. आता जवळपास १० महिन्यांचा कालावधी उलटत चालला आहे. या १० महिन्यांच्या कालावधीत ५ लाख ५६ हजार ८८८ नागरिकांनी पहिला डाेस तर २ लाख ३४ हजार १२ नागरिकांनी दुसरा डाेस घेतला आहे. लवकरात लवकर १०० टक्के नागरिकांना लस उपलब्ध हाेईल, यासाठी आराेग्य विभाग प्रयत्नरत आहे.

कुरखेडा तालुक्यात लसीकरण

-    पहिला व दुसरा डाेस घेण्यात कुरखेडा तालुक्यातील नागरिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. कुरखेडा तालुक्याची एकूण लाेकसंख्या ९५ हजार ४९५ एवढी आहे. त्यापैकी ६७ हजार ७४ नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. -   त्यापैकी ६२ हजार ३०९ नागरिकांनी पहिला डाेस घेतला आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ९२.९० टक्के एवढे आहे. ३१  हजार ३६५ नागरिकांनी दुसरा  डाेस घेतला आहे. टक्केवारीमध्ये  हे प्रमाण ४६.७६ टक्के एवढे आहे. 

२४ वाहनांमुळे गती वाढलीगावाेगावी जाऊन लस देण्यासाठी आराेग्य विभागाला सुमारे २४ वाहने उपलब्ध झाली आहेत. ही वाहने चालविण्यासाठी चालक भरतीसुद्धा केली जात आहे. वाहनांच्या मदतीने खेड्यापाड्यात पाेहाेचणे लसीकरण पथकाला शक्य हाेत असल्याने लसीकरणाची गती वाढली आहे. नागरिकांच्या मनामध्ये लसीकरणाविषयी असलेली भीती कमी झाली आहे. त्यामुळे नागरिक स्वत:हून लस घेण्यास पुढे येत आहेत. नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व आराेग्य कर्मचारी, गावातील सुशिक्षित नागरिक पटवून देत आहेत. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या